शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

कोणार्क रेसिडेन्सीच्या फ्लॅटविक्रीवर बंदी, क्लब, कार्यालय सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 06:51 IST

औद्योगिक क्षेत्राचे रहिवासी क्षेत्रात रूपांतर केल्याची साडेनऊ कोटींची फी न भरल्याने कोणार्क रेसिडेन्सीचे क्लब हाऊस आणि कार्यालय प्रांत कार्यालयाने सील केले. याप्रकाराने कोणार्क गृहसंकुल वादात सापडले आहे. त्यांना फ्लॅट विकण्यावरही बंदी घातली आहे.

उल्हासनगर -  औद्योगिक क्षेत्राचे रहिवासी क्षेत्रात रूपांतर केल्याची साडेनऊ कोटींची फी न भरल्याने कोणार्क रेसिडेन्सीचे क्लब हाऊस आणि कार्यालय प्रांत कार्यालयाने सील केले. याप्रकाराने कोणार्क गृहसंकुल वादात सापडले आहे. त्यांना फ्लॅट विकण्यावरही बंदी घातली आहे.उल्हासनगरातील कॅम्प एकमध्ये शहाड स्टेशनशेजारी बंद कंपनीच्या जागेत कोणार्क रेसिडेन्सी आहे. त्यात २६० प्लॅट असून कारवाईमुळे ते अडचणीत आले आहेत.गेल्यावर्षी मे महिन्यात राज्य सरकारने ही फी भरण्याचे आदेश कोणार्क ग्रूपला दिले होते. मात्र त्यांनी त्याचा भरणा न केल्याने बोट क्लब व कार्यालय सील करण्याचे आदेश प्रांत कार्यालयाने दिले. तसेच त्यांच्या फ्लॅट विकण्यावरही निर्बंध घातले आहेत. रजिस्टर प्रबंधक कार्यालयालाही या प्लॅटच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करू नका, असे आदेश देण्यात आले आहेत.औद्योगिक क्षेत्राचे निवासी क्षेत्रात रूपांतर केल्याचे शुल्क भरलेले नसतानाही पालिकेच्या नगररचनाकार विभागाने या गृहसंकुलाला बांधकामाची परवानगी कशी दिली, असा प्रश्न निर्माण झाला होता. तत्कालीन नगररचनाकार संजीव करपे यांनीही गृहसंकुलाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला आणि इतर परवानगी दिली नव्हती. या प्रकारावरून संतापलेल्या भाजपाच्या एका नगरसेवकाने करपे यांच्या कार्यालयात धिंगाणा घालून आत्मदहनाची धमकी दिल्याची चर्चा त्यावेळी पालिका वर्तुळात रंगली होती.कोणार्क ग्रुप अडचणीत?राज्यासह देशात अनेक ठिकाणी कोणार्क ग्रूपने महापालिकांच्या जकात वसुलीचा ठेका घेतला होता. तसेच कोट्यवधींच्या निधीतून विकासात्मक योजना राज्यात राबवल्या. उल्हासनगर पालिकेत कोणार्कने ३०० कोटीची पाणी वितरण योजना उभारली. कचरा उचलण्याचा ठेका याच कोणार्क कंपनीकडे आहे. असे असूनही वर्षभरात कोणार्क रेसिडेन्सीने साडेनऊ कोटी सरकारकडे न भरल्याने हा ग्रूप आर्थिक अडचणीत सापडल्याची चर्चा पालिकेत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्याचा हा परिणाम असल्याचे मानले जाते. मात्र कंपनीने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.बघ्याची भूमिकाकोणार्क गृहसंकुलात फ्लॅट खरेदी करण्यापूर्वी महापालिकेकडे विचारणा करा. तोवर खरेदी करून नका, अशा आशयाचा फलक पालिकेने लावला होता. तो उखडून फेकून देण्यात आला. तरीही पालिका बघ्याच्या भूमिकेत आहे.

टॅग्स :Homeघरthaneठाणे