शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात मिळत नाहीत सुविधा; 'आप'चा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 2:27 PM

सामान्य जनतेच्या आरोग्याच्या आधार असलेल्या या रुग्णालयात नागरिकांनी पुरेशा आरोग्य सेवा मिळत नाहीत.

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दोन मोठय़ा रुग्णालयासह नागरी आरोग्य केंद्रात नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नाही. या प्रकरणी 'आम आदमी पार्टी'तर्फे (आप) वारंवार महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने 'आप'च्या शिष्टमंडळाने आज सोमवारी महापालिका मुख्यालयात धडक दिली. मात्र, त्यांना आयुक्त व आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट नाकारली. यावेळी त्यांना वैद्यकीय अधिकारी बुधवारी भेटणार असल्याचे सांगण्यात आले. 'आप'चे रवी केदारे, राजू शेलार, सागर खाडे, निलेश व्यवहारे, गणेश आव्हाड, रुपेश चौहान, विनोद जाधव, सचिन जोशी आणि शफीक शेख यांनी मुख्यालयात धाव घेतली. महापालिकेचे कल्याण येथे रुक्मीणीबाई रुग्णालय व डोंबिवली येथे शास्त्रीनगर रुग्णालय ही दोन बडी रुग्णालये आहे. सामान्य जनतेच्या आरोग्याच्या आधार असलेल्या या रुग्णालयात नागरिकांनी पुरेशा आरोग्य सेवा मिळत नाहीत. याशिवाय महापालिकेची 13 ठिकाणी नागरी आरोग्य केंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रात साध्या उपचाराची औषधेही उपलब्ध नसतात. महापालिकेच्या आस्थपना सूचीवर डॉक्टर व इतर पॅरा मेडिकल स्टॉफची मंजूर पदे आहेत. त्यापैकी असंख्य पदे रिक्त आहे. विशेषज्ज्ञ डॉक्टरांची वाणवा आहे. रुग्णालयात आयसीयू, सिटी स्कॅन, सोनोग्राफी यासारख्या सुविधा दिल्या जात नाही. महापालिका दोन्ही रुग्णालयावर वर्षाला 30 कोटी रुपयांचा खर्च करते. त्यापैकी 17 कोटी रुपयांचा खर्च आस्थापनेवर होते. उर्वरीत 13 कोटी रुपये नागरीकांच्या आरोग्यावर खर्च होतात. 3 कोटी रुपये खर्च करुन पुरेशा आरोग्य सेवा मिळत नसल्याविषयी 'आप'चे दीपक दुबे यांनी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरु ठेवला आहे. त्यांनी माहितीच्या अधिकारात आरोग्य सेवेची माहिती काढली आहे. त्यांच्या पाठपुराव्या पश्चात आरोग्य सेवेत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीने आज आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यासाठी आयुक्तांच्या भेटीची वेळ आधी घ्यावी लागेल, असे आयुक्त कार्यालयातून शिष्टमंडळास सांगण्यात आले. बुधवारी भेटीसाठी या मग चर्चा करु असे आश्वासन 'आप'ला देण्यात आले. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाhospitalहॉस्पिटल