शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कापूरबावडी उड्डाणपूल सोमवारी खुला

By admin | Updated: August 16, 2015 02:10 IST

मुंबईकडे जाणारी कापूरबावडी उड्डाणपुलाची ८०० मीटरची लेन अखेर सोमवारी खुली होणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी कोंडी फुटणार असून थोडासा वळसा घालून का होईना परंतु

ठाणे : मुंबईकडे जाणारी कापूरबावडी उड्डाणपुलाची ८०० मीटरची लेन अखेर सोमवारी खुली होणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी कोंडी फुटणार असून थोडासा वळसा घालून का होईना परंतु वाहतूककोंडीमुक्त प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे आता ७० टक्के वाहतूक ही या लेनवरून केली जाणार असल्यामुळे कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शन वाहतूककोंडीमुक्त होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लेनचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. दरम्यान, येथील चार लेन यापूर्वीच खुल्या करण्यात आल्या आहेत. पण मुंबईकडे जाणारी लेन मात्र सुमारे सात वर्षे रखडली होती. या लेनचे काम पूर्ण झाल्यानंतर केवळ मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, म्हणून याचा शुभारंभ रखडला असल्याचा गवगवा करण्यात आला होता. परंतु, वाहनचालकांना होणारा विलंब आणि कोंडी लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन करून ही लेन खुली करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर, काही किरकोळ कामे शिल्लक असल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली. मधल्या कालावधीत या पुलाला तडे गेल्याचा मुद्दा पुढे आला. त्यामुळे पुन्हा एकदा त्याचा शुभारंभ लांबणीवर पडला. यासंदर्भात अधिक चौकशीसाठी पालकमंत्र्यांनी एकसदस्यीय समितीही नेमली होती. त्यानंतर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ही लेन खुली करण्याचा दावा केला होता. परंतु, त्यानंतर दोन वेळा या लेनची लोड टेस्ट घेण्यात आली. त्यानंतरही केवळ समितीचा अहवाल न आल्याने ही लेन खुली करता येत नसल्याची माहिती एमएसआरडीसीने दिली. परंतु, आता तिचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून सगळ्या अडथळ्यांच्या शर्यती पार करून ती सोमवारी वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना आता घोडबंदर, बाळकुम येथून येणाऱ्या वाहनांना थेट मुंबईकडे जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्या येथील मार्गावरून २५ ते ३० हजार वाहने रोज मुंबईच्या दिशेने जात आहेत. परंतु, ही लेन खुली न झाल्याने त्याचा ताण कापूरबावडी आणि माजिवडा जंक्शनवर पडत होता. मात्र, आता ही लेन खुली होत असल्याने ७० टक्के वाहने तिचा वापर करणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी तर सुटलेच तसेच मुंबईतही लवकर पोहोचता येणार आहे. (प्रतिनिधी)