कल्याण पूर्वमध्ये शिवसेनेची आज बंदची हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 10:28 IST2018-01-04T09:39:21+5:302018-01-04T10:28:55+5:30

पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शिवसेनेनं आज कल्याण पूर्व भागात बंदची हाक दिली आहे.

Kalyan: Shivsainik will protest Against the police action | कल्याण पूर्वमध्ये शिवसेनेची आज बंदची हाक

कल्याण पूर्वमध्ये शिवसेनेची आज बंदची हाक

डोंबिवली - कल्याण पूर्व येथे शिवसेना शाखेत घुसून पोलिसांनी शिवसैनिकांवर लाठीचार्ज करत त्यांना अटक केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा निषेध म्हणून शिवसेनेनं कल्याण पूर्व भागात बंदची हाक दिली आहे.  कल्याणमध्ये शिवसेना उपशहर प्रमुख पाटील हे बुधवारी रात्री शाखेत असताना पोलिसांनी शाखेची पाहणी केली व त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईविरोधात शिवसैनिक एकत्र येणार आहेत, अशी माहिती माजी महापौर रमेश जाधव यांनी दिली.

बंदनंतर डोंबिवली पूर्वपदावर 
भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ  बुधवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर रेल रोको, रास्ता रोको आंदोलनानंतर गुरुवारी डोंबिवलीतील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. रेल्वे वाहतूक वेळापत्रकानुसार सुरू आहे. शहरातील शाळा सुरूदेखील व्यवस्थित सुरू आहेत.  शहरात शेलार नाका, रेल्वे स्थानक, बस स्टँड इत्यादी ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणावरून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कल्याणमध्ये मात्र तणावपूर्ण शांतता असून शिवसेना पूर्वमध्ये बुधवारी शिवसैनिकांविरोधात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.
 

Web Title: Kalyan: Shivsainik will protest Against the police action