शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

गणेश नाईकांनी पक्षाची वाट लावली, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 14:07 IST

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती टीका केली आहे.

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये जाण्याच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घणाघाती टीका केली आहे. गणेश नाईक यांनी पक्षाची वाट लावली. नाईक हे पाच वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील, असे मी वारंवार सांगत होतो, मात्र पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले, अखेरीस आज मी ज्याची भीती व्यक्त केली होती तेच घडत आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. भाजपाच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार शरसंधान केले. ते म्हणाले, ''गणेश नाईक 2014 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार होते. जेव्हा शरद पवार यांचे ऑपरेशन सुरू होते. तेव्हा गणेश नाईक हे गुप्त बैठका घेण्यात गुंतले होते. त्यांच्या या हालचालींविषयी मी पक्षाला वारंवार सुचित केले. मात्र पक्षाने माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले.''गणेश नाईक यांनी पक्षवाढीसाठी काहीही योगदान दिले नाही, असा आरोपही आव्हाड यांनी यावेळी केला. राज्यात सत्ता असतानाही कल्याण-डोंबिवली,  भिवंडी, मिरा-भायंदर मध्ये चांगली ताकद असतानाही राष्ट्रवादी वाढली नाही. गणेश नाईक हे पाच वर्षांत पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील, असे मी वारंवार सांगत होतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आता इथे जी फाटाफूट होत आहे त्यामागे गणेश नाईक यांचा हात असेल,'' असेही आव्हाड म्हणाले.कुठलाही पक्ष घरात बसून वाढत नाही, आता सरंजामशाही गेली, अशा टोलाही आव्हाड यांनी लगावला. गणेश नाईक यांनी नवी मुंबईत विकास केला हे मान्य मात्र सर्व सत्ता नाईक कुटुंबाकडे केंद्रित केली. गणेश नाईक, संजीव नाईक, सागर नाईक, तुकाराम नाईक अनेकांना सत्तापदे मिळाली, असेही आव्हाड यांनी सांगितले. आज भाजपाच्या नेत्या मंदा म्हात्रे आम्ही गणेश नाईक यांचे नेतृत्व स्वीकारणार नाही, असे उघडपणे सांगत आहेत. मग आता गणेश नाईक यांचा स्वाभिमान कुठे गेला, असा सवालही अव्हाड यांनी केला. 

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNavi Mumbaiनवी मुंबईNCPराष्ट्रवादी काँग्रेस