शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मुंब्रा स्थानकाच्या नामकरणावरून आव्हाड आणि मोहित कंबोज आमने-सामने, ट्विटरवर जोरदार शाब्दिक युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 12:08 IST

Mumbra Railway Station: मोहित कंबोज यांनी केलेल्या मुंब्रा स्टेशनच्या नामांतराच्या मागणीला कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. आता या मुद्द्यावरून मोहित कंबोज आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. 

ठाण्याजवळील मुंब्रा रेल्वे स्टेशनचं नामकरण मुंब्रादेवी करावं, अशी मागणी भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. मोहित कंबोज यांनी केलेल्या या मागणीला कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. आता या मुद्द्यावरून मोहित कंबोज आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. 

मुंब्रा रेल्वे स्थानकाचं नाव येथील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मुंब्रादेवीच्या नावावरून मुंब्रादेवी असं करावं, अशी मागणी मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्याला आक्षेप घेतला होता. 

यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, मुंब्रा हे एक महसुली गाव होते. त्याचं नाव मुंब्रा देवीच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर येथील रेल्वेस्टेशनलाही तेच नाव देण्यात आलं. आता महालक्ष्मी स्टेशनचं नामकरण तुम्ही महालक्ष्मी देवी असं करायला सांगणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करतो.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटला मोहित कंबोज यांनी पुन्हा उत्तर दिलं आहे. आव्हाड साहेब मुंबा स्टेशनचं नामकरण मुंब्रादेवी झाल्यास अडचण काय आहे. यात देवीचं नाव येत असल्यानं तुम्ही विरोध करत आहात का? याआधीही अनेक स्टेशनची नावं बदलण्यात आली, तेव्हा तर प्रश्न निर्माण झाला नव्हता. आज मी मुंब्रा स्टेशनचं नाव मुंब्रादेवी करण्यात यावं,  अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करतो, असे मोहित कंबोज म्हणाले. 

टॅग्स :mumbraमुंब्राMohit Kambojमोहित कंबोज भारतीयJitendra Awhadजितेंद्र आव्हाड