शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओने वसईत नष्ट केल्या जेसीबीने दीडशे रिक्षा

By admin | Updated: January 11, 2016 01:47 IST

आरटीओने वसईतील भंगार रिक्षांविरोधात धडक मोहिम हाती घेतली असून आतापर्यत ३५० रिक्षा जप्त करून त्यापैकी १५० रिक्षा जेसीबीच्या साहय्याने कायमच्या नष्ट करण्यात आल्या आहेत

शशी करपे, वसईआरटीओने वसईतील भंगार रिक्षांविरोधात धडक मोहिम हाती घेतली असून आतापर्यत ३५० रिक्षा जप्त करून त्यापैकी १५० रिक्षा जेसीबीच्या साहय्याने कायमच्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तर कारवाईत नऊ महिन्यांत १६ लाखांचा दंडवसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अधिकृत रिक्षा स्टँण्डसाठी १५० ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून त्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.बेकायदा आणि भंगार रिक्षांमुळे वसईत वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून आरटीओ कार्यालयातून अशा रिक्षांविरोधात धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. गेल्या नऊ महिन्यात वसईतून सुमारे ३५० भंगार रिक्षा शोधण्यात आल्या आहेत. पूर्वी भंगार रिक्षा मोडित काढण्यासाठी गॅस कटरचा वापर केला जात होता. पण, कटरने कापल्यानंतर पुन्हा रिक्षा तयार करून बेकायदेशिरपणे वापरात आणल्या जात होत्या. म्हणूनच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी जेसीबी मशिनने रिक्षा कायमस्वरुपी नष्ट करण्यास सुरुवात केली. आहे. अशा पद्धतीने आतापर्यंत १५० रिक्षा नष्ट करण्यात आल्या आहेत. आरटीओने रिशांची तपासणी करून अधिकृत रिक्षावर परवाना क्रमांक आणि परवान्यांची मुदत ठळक अक्षरश: रिक्षांच्या दोन्ही बाजूला लिहीणे बंधनकारक केले. त्यामुळे अधिकृत रिक्षा कोणत्या हे ओळखणे सोपे झाले आहे.