दिव्यातील कृष्ण जन्माष्टमी अंधारात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 12:18 IST2018-09-03T12:17:03+5:302018-09-03T12:18:34+5:30

दिव्यात रविवारी दुपारी 3- 4 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे.

Janmashtami no electricity in diva | दिव्यातील कृष्ण जन्माष्टमी अंधारात 

दिव्यातील कृष्ण जन्माष्टमी अंधारात 

ठाणे : दिव्यात रविवारी (2 सप्टेंबर) दुपारी 3- 4 वाजल्यापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव दिव्यातील नागरिकांना अंधारात साजरा करावा लागला आहे. महावितरण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. 

महावितरण येथे फोन केल्यावर कोणी फोन उचलत नाही तसेच फोन बंद आहेत असा आरोप दिव्यातील नागरिकांनी करत या समस्येतून कधी सुटका होणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात ही वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. यावरून स्थानिक राजकारण चांगलेच तापले होते. त्यानंतर येथील वीज पुरवठा सुरळीत झाला होता. मात्र आता जसे सण जवळ येत आहेत तसेच विजेचा लपंडाव पुन्हा एकदा सुरू झाला आहे.
 

Web Title: Janmashtami no electricity in diva