शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

इस्रायली विद्यार्थी करणार वाड्यातील जि.प. शाळेचा कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:57 PM

इस्त्रायलच्या ४० विद्यार्थ्यांची टीम वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली असून येत्या चार ते पाच दिवसातच ते या शाळेचा कायापालट करणार आहेत.

- वसंत भोईरवाडा : इस्त्रायलच्या ४० विद्यार्थ्यांची टीम वाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली असून येत्या चार ते पाच दिवसातच ते या शाळेचा कायापालट करणार आहेत. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी नगरसेवक मनिष देहेरकर, गट शिक्षणाधिकारी कृष्णा जाधव व रोहन ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. हे ४० इस्त्रायली विद्यार्थी जगभरात अनेक देशांचे दौरे करीत असून विविध देशातील शिक्षण प्रणालीचा अभ्यास करीत आहेत. या वेळी त्यांनी भारताचा दौरा करण्याची इस्त्रायल सरकार कडे परवानगी मागितली होती. इस्त्रायलने भारत सरकार सोबत चर्चा करून या विद्यार्थ्यांना भारताचा दौरा करण्याची अनुमती देण्याची विनंती केल्यामुळे व ती भारताने दिल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील आदिवासी भागाचा दौरा करण्याचे निश्चित केले. या साठी विशेष करून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच थ्री सिक्स्टी फाऊंडेशन चे चेअरमान रोहन ठाकरे यांनी पालघर जिल्ह्याची निवड कारण्यासंदर्भात इस्त्राईली दूतावासासोबत चर्चा केली. या टीमच्या काही सदस्यांनी पालघर जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांचा सर्व्हे केल्यानंतर वाडा शहरातील शाळा नंबर २ ची निवड करण्यात आली आणि शनिवारी या विद्यार्थ्याची संपूर्ण टीम सोमवारी येथे दाखल झाली.भारतीय शिक्षण पद्धती तसेच येथील आदिवासी संस्कृतीचा हे युवक अभ्यास करणार असून या पाच दिवसांत शहरातील जिल्हापरिषद शाळा क्रमांक्र २ च्या शाळेचा कायापालट करणार आहेत. यामध्ये खेळणी, विज्ञान उपकरणे देणार इस्त्राईल, रंगरंगोटी करणार चमूविद्यार्थ्यांचा क्लास घेणे, शाळेची रंगरंगोटी करणे, मुलांना खेळण्यासाठी गार्डन तयार करणे, खेळाचे साहित्य,सायन्स ची विविध उपकरणे, इस्त्रायल सरकार कडून शाळेतील मुलांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही शाळा आदर्श ठरेल अशा पद्धतीने तिचा कायापालट केला जाणार आहे.या स्वागत समारंभ दरम्यान इस्त्राईल विद्यार्थी टीमचे प्रमुख लिओन तौली यांनी या दौऱ्याचा उद्देश सांगितला तर नगरसेवक मनिष देहेरकर यांनी वाडा जिल्हा परिषद शाळेची या स्तुत्य उपक्र मासाठी निवड केल्याने नगर पंचायत व वाडा शहराच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

टॅग्स :palgharपालघरthaneठाणेSchoolशाळाIsraelइस्रायलStudentविद्यार्थी