ठाणे : आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने बुधवारी अत्रे कट्ट्यावर आरजे अंजली कुलकर्णी यांनी आॅडीओ माध्यमातील अनुभव सांगितले. यावेळी कट्ट्याच्या अध्यक्षा शीला वागळे यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारुन बोलते केले. आपल्या एका आॅडीओ शोचा प्रसंग कथन करताना कुलकर्णी म्हणाल्या की, ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात जास्त वाचन करवत नाही तर ते त्याऐवजी आॅडीओ बुक ऐकू शकतात. आपले अनुभव आॅडीओशी आपल्याला कनेक्ट करता येतात. आॅडीओ व व्हिज्वलमध्ये बेसिक फरक आहे आणि तो असणारच आहे. जे आॅडीओ ऐकण्याचा आनंद घेतात त्यांना हे माध्यम नक्की आवडेल असेही त्या म्हणाल्या. आॅडीओ बुकच्या स्टेप्स सांगताना त्या म्हणाल्या की, पहिली स्टेप ही स्क्रिप्टींग आहे, त्यानंतर रेकॉर्डींग, एडिटींग, , मिक्सींग, साऊण्ड कुठे कसे वापरावे, इफेक्ट कुठे कसे वापरायचे हे ठरवावे लागते. या माध्यमात काम करताना आवाजासाठी ठरावीक व्यायाम करावा लागतो, आवाजात जपून वापरावा लागतो असेही त्या म्हणाल्या. माझी सुरूवात आकाशवाणीतून झाली त्यामुळे तेथे काय बोलावे, काय टाळावे हे सांगितले जाते. आरजे म्हणून काम करताना बोलण्याची आवड, संवाद कौशल्य, संयम, समोरच्याचे बोलणे प्रेमाने, आदराने ऐकणे, श्रोते म्हणून चांगले असावे, निरीक्षणशक्ती असावी, वाचन हवे ही कौशल्य असावी असे सांगताना त्या म्हणाल्या की, या क्षेत्रात येण्यासाठी नवोदितांना भरपूर संधी आहेत. दरम्यान, अमुल पंडीत यांचा गिरीश ओक यांच्या आवाजातील उंदीयो हा ललित लेख उपस्थितांना ऐकविण्यात आला. मुलाखतीच्या शेवटी श्रोत्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारुन आपल्या शंकांचे निरसन केले. स्मिता पोंक्षे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
अत्रे कट्ट्यावर उलगडले आॅडीओ माध्यमातील अनुभव, आरजे अंजली कुलकर्णी यांची मुलाखत संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 16:10 IST
ठाणे : आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने बुधवारी अत्रे कट्ट्यावर आरजे अंजली कुलकर्णी यांनी आॅडीओ माध्यमाती ल अनुभव सांगितले. यावेळी कट्ट्याच्या अध्यक्षा शीला वागळे यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारुन बोलते केले. आपल्या एका आॅडीओ शोचा प्रसंग कथन करताना कुलकर्णी म्हणाल्या की, ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात जास्त वाचन करवत नाही ...
अत्रे कट्ट्यावर उलगडले आॅडीओ माध्यमातील अनुभव, आरजे अंजली कुलकर्णी यांची मुलाखत संपन्न
ठळक मुद्देअत्रे कट्ट्यावर उलगडले आॅडीओ माध्यमातील अनुभवआरजे अंजली कुलकर्णी यांची मुलाखत संपन्नशीला वागळे यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारुन केले बोलते