शहरातील १४ अभ्यासिकांमध्ये अंधांसाठी ‘आॅडिओ लायब्ररी’ महापालिकेचा उपक्रम : तीन टक्के राखीव निधीतून खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:31 AM2018-04-27T00:31:56+5:302018-04-27T00:31:56+5:30

नाशिक : महापालिकेने दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधीतून अंध बांधवांकरिता शहरातील १४ अभ्यासिका-वाचनालयांमध्ये आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून दिल्या.

The 'Audio Library' program for the blind in 14 of the city's publications: 3% | शहरातील १४ अभ्यासिकांमध्ये अंधांसाठी ‘आॅडिओ लायब्ररी’ महापालिकेचा उपक्रम : तीन टक्के राखीव निधीतून खर्च

शहरातील १४ अभ्यासिकांमध्ये अंधांसाठी ‘आॅडिओ लायब्ररी’ महापालिकेचा उपक्रम : तीन टक्के राखीव निधीतून खर्च

Next
ठळक मुद्देशहरातील अंध बांधवांना आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून देण्याचा निर्णय या उपक्रमांतर्गत अभ्यासिकांना एक सीडी प्लेअर, हेडफोन उपलब्ध

नाशिक : महापालिकेने दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधीतून अंध बांधवांकरिता शहरातील १४ अभ्यासिका-वाचनालयांमध्ये आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून दिल्या असून, इतरही अभ्यासिका-वाचनालयांना मागणीनुसार आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
महापालिकेमार्फत अपंगांसाठी राखीव ३ टक्के निधीतून दिव्यांगांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मागील वर्षी, अभिषेक कृष्ण यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा एक कृती आराखडाच तयार केला होता. त्यानुसार, अनेक कामे हाती घेण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील अंध बांधवांना आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. सदर प्रकल्पाचे काम मनपाच्या विद्युत विभागाकडे सोपविण्यात आले होते. त्यानुसार, महापालिकेमार्फत सद्य:स्थितीत शहरातील १४ अभ्यासिका-वाचनालयांमध्ये आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत अभ्यासिकांना एक सीडी प्लेअर, हेडफोन उपलब्ध करून दिला असून, नॅबच्या सहकार्याने अंध बांधवांसाठी उपयुक्त अशा २०० सीडीजही त्याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. या उपक्रमासाठी महापालिकेने प्रत्येक ठिकाणी ३० हजार रुपये खर्च केला आहे. संबंधित अभ्यासिकांमधील कर्मचाºयांनी अंध बांधवांना त्यांच्या मागणीनुसार सदर सुविधा उपलब्ध करून द्यायची असून, तसे प्रतिज्ञापत्र संबंधितांकडून महापालिकेने लिहून घेतले आहे. सद्य:स्थितीत शहरातील १४ अभ्यासिकांमध्ये सदर आॅडिओ लायब्ररी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, ज्या अभ्यासिका अथवा वाचनालये मागणी करतील, त्यांनाही ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता वनमाळी यांनी दिली आहे.
याठिकाणी बसविल्या आॅडिओ लायब्ररी
महापालिकेने नवीन पंडित कॉलनीतील अण्णासाहेब मुरकुटे अभ्यासिका, बाल गणेश फाउंडेशन, गंगापूररोडवरील श्रीमती माई लेले विकास विद्यालय, कृषिनगर येथील एन.एफ.बी.एम व्यवसाय केंद्र, सरस्वती लेनमधील राष्टÑमाता जिजाऊ मॉँ साहेब अभ्यासिका, नाशिक-पुणे महामार्गावरील शासकीय अंधशाळा, गंगापूररोडवरील समर्थ अभ्यासिका, नाशिकरोड देवीचौकातील नागरिक अभिनव वाचनालय, नाशिकरोड येथे महापालिकेचे सार्वजनिक वाचनालय, सातपूर येथील नॅब महाराष्टÑ युनिट, मेरीतील लोकमान्य वाचनालय, म्हसरूळ येथील सार्वजनिक वाचनालय, मखमलाबाद येथील सार्वजनिक वाचनालय आणि खुटवडनगर येथील डॉ. सुधीर फडके सार्वजनिक वाचनालयात आॅडिओ लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

Web Title: The 'Audio Library' program for the blind in 14 of the city's publications: 3%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.