शहरं
Join us  
Trending Stories
1
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
2
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
3
कॅनडा सोडायची वेळ आली? १० लाख भारतीयांचे 'लीगल स्टेटस' धोक्यात; जंगलात टेंट लावून राहण्याची आली वेळ!
4
कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत
5
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
7
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
8
पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
9
संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक
10
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
11
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
12
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
13
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ जानेवारी २०२६ : दिवस अत्यंत आनंददायी, पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल!
15
सोलापूर हादरले : ‘बिनविरोध’साठी झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहराध्यक्षाचा भरदिवसा खून
16
बिनविरोधचे हसू अन् बंडखोरीचे आसू; महामुंबईतील मोजके बंडखोरही सत्ताधाऱ्यांचेच; अनेकांनी घेतली माघार
17
राज्यात फक्त अन् फक्त मराठीच सक्तीची! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी स्पष्टोक्ती  
18
धक्कादायक! नागपुरात १२ वर्षीय मुलाला आई-वडिलांनीच साखळी कुलपाने बांधून ठेवले 
19
मराठी दलित साहित्य हा भारतीय साहित्यविश्वाचा आधारस्तंभ - मृदुला गर्ग  
20
मराठी शाळा टिकव्यात, इथेच ज्ञानेश्वर-तुकोबा घडतील; विश्वास पाटील यांचे प्रशासकीय उदासीनतेवर बोट
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 

By धीरज परब | Updated: October 4, 2025 20:53 IST

Cyber Crime News: मीरारोडच्या दोघा तरुणांना थायलंड येथे फेसबुक मध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांना थायलंड वरून बेकायदा म्यानमार देशात नेऊन सायबर गुन्ह्यासाठी बळजबरीने राबवण्यात आले. तेथून सुटका करण्यासाठी त्यांच्या कडून खंडणी वसूल करण्यात आली.

- धीरज परबमिरारोड - मीरारोडच्या दोघा तरुणांना थायलंड येथे फेसबुक मध्ये नोकरीचे आमिष दाखवून त्यांना थायलंड वरून बेकायदा म्यानमार देशात नेऊन सायबर गुन्ह्यासाठी बळजबरीने राबवण्यात आले. तेथून सुटका करण्यासाठी त्यांच्या कडून खंडणी वसूल करण्यात आली. मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ ने हे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणत दोघांना अटक केली असल्याची माहिती मिरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. ह्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार चीनचा आहे व अशा अनेक टोळ्या कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

थायलंड देशात फेसबुक कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष नया नगरच्या हैदरी चौक भागात राहणार आसिफ खान ऊर्फ नेपाळी याने नयानगर भागातील सय्यद इरतिझा हुसैन व अम्मार लकडावाला यांना दाखवले. ऑगस्ट २०२५ मध्ये आसिफ खान याने म्यानमार देशात असलेला त्याचा साथिदार अदनान शेख याच्या मदतीने दोघांना थायलंड येथे पाठवून दिले. हुसेन व लाकडावला यांना थायलंड मधील इतर साथीदारांच्या मदतीने बेकायदेशीरपणे म्यानमार या देशात सायबर गुलामगिरीकरीता मानवी तस्करी करून पाठवले. याची माहिती गोपनिय बातमीदारांमार्फत मीरा भाईंदर गुन्हे शाखा कक्ष १ ला मिळाली होती. पोलिस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे व पथकाने माहितीवरून म्यानमार मध्ये डांबून ठेवलेल्यांशी नमूद संपर्क साधला असता त्यांनी झालेल्या फसगत बद्दल सांगितले. 

त्या दोघांना म्यानमार देशातील युयू८ या सायबर फ्रॉड करणाऱ्या कंपनीत लिओ या चिनी व स्टिव्ह आण्णा या भारतीयाने त्यांना भारतीय मुलींच्या नावाने बनावट फेसबुकवर खाते उघडून दिले. त्याद्वारे परदेशातील भारतीय लोकांशी फ्रेंडशिप करून त्यांचा व्हाटस्अप नंबर मिळवायचा व त्यांना विश्वासात घेवून क्रिप्टोकरन्सी व बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगून त्यांची फसवणूक करण्याचे काम करण्याचे प्रशिक्षण दिले. त्या नंतर त्यांना अशी अनेकांची फसवणूक करून सायबर गुन्हा करण्याच्या कामास भाग पाडले. 

ह्या दोघांना कंपनीच्या इमारतीच्या बाहेर जाण्यास देखील बंदी घालण्यात आली होती. काम न केल्यास त्यांचा शारिरीक छळ केला. ह्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी आरोपीतांनी फसलेल्या दोघां कडून प्रत्येकी ७ हजार अमेरीकन डॉलर्स म्हणजे भारतीय चलनातील ६ लाख रुपये खंडणी म्हणून ५ भारतीय बँक खात्यांवर वसूल केली आहे. खंडणीची रक्कम जमा झाल्यानंतर त्यांची म्यानमार देशातून मुक्तता केली गेली. मीरारोड मध्ये परत आल्या नंतर त्यांच्या फिर्यादीनुसार नयानगर पोलीस ठाण्यात ८ जणां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हयाच्या तपासादरम्यान गुन्हे शाखेने एजंट आसिफ खान ऊर्फ नेपाळी ह्याला नयानगर मधून अटक केली आहे. खंडणीची रक्कम स्विकारणाऱ्या पैकी एक आरोपी रोहीत कुमार मरडाणा रा. विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश ह्याला गुजरातच्या सुरत येथून अटक करण्यात आली आहे. त्याने सदरची रक्कम कुठे पाठविली तसेच अन्य आरोपींचा तपास सुरू आहे. ह्या रॅकेट मध्ये अनेक भारतीय तरुण अडकल्याचे सांगण्यात आले. आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, सहायक निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक उमेश भागवत सह अशोक पाटील, संजय शिंदे, पुष्पेंद्र थापा, मनोज चव्हाण, सचिन हुले, स्वप्निल मोहिले, प्रशांत विसपुते, गौरव बारी व धिरज मेंगाणे यांनी तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian youths trapped in cybercrime, international gang busted, two arrested.

Web Summary : An international gang luring Indian youths into cybercrime was exposed in Mira Road. Two were arrested for trafficking youths to Myanmar for forced cyber fraud, extorting ransom for release. The mastermind is Chinese, revealing a widespread network.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमMira Bhayanderमीरा-भाईंदर