अ‍ॅसिड टाकण्याची दिराची धमकी

By Admin | Updated: May 18, 2017 00:10 IST2017-05-18T00:10:59+5:302017-05-18T00:10:59+5:30

विनयभंग करून अ‍ॅसिड टाकून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नितीन सिंग आणि सचिन सिंग या दोघा भावांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

The intense threat of acid throwing | अ‍ॅसिड टाकण्याची दिराची धमकी

अ‍ॅसिड टाकण्याची दिराची धमकी

- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विनयभंग करून अ‍ॅसिड टाकून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नितीन सिंग आणि सचिन सिंग या दोघा भावांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सासरी त्रास होत असल्यामुळे २८ वर्षीय विवाहिता ही वागळे इस्टेट येथील लुईसवाडीतील आपल्या माहेरी वास्तव्याला आली. ती ६ मे २०१७ रोजी दुपारी २.३० वा.च्या सुमारास वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक १६ येथून जात असताना तिचे दीर नितीन (२९)आणि सचिन (२५) यांनी तिचा पाठलाग केला. ती रस्ता ओलांडत असतानाच सचिन याने तिच्या हातातील बॅग खेचली.

Web Title: The intense threat of acid throwing