शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

संच मान्यतेला आवर घाला : शिक्षकांचे मोतेंना साकडे

By admin | Updated: February 1, 2016 01:11 IST

राज्याच्या शिक्षण विभागात सध्या संच मान्यता विषयक नवीन रचना करण्याचे काम सुरू असून यामुळे सर्व शाळांतून १ ली ते ५ वी व ६ वी ते ८ वी अशी रचना करून त्यानुसार शिक्षक

वाडा : राज्याच्या शिक्षण विभागात सध्या संच मान्यता विषयक नवीन रचना करण्याचे काम सुरू असून यामुळे सर्व शाळांतून १ ली ते ५ वी व ६ वी ते ८ वी अशी रचना करून त्यानुसार शिक्षक पदांची रचना केली जाणार आहे. या पटानुसार अनेक शिक्षकांची उचलबांगडी होणार असल्याने शिक्षकात घबराट असून या संच मान्यतेला आवरा, असे साकडे शिक्षकांनी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांना घातले आहे.राज्य सरकारने शिक्षण विभागात प्रगत शिक्षणाची घोषणा करीत प्राथमिक शिक्षणात आर टी ई नुसार १ ली ते ५ वी व ६ वी ते ८ वी असे प्राथमिक शिक्षणाचे दोन विभाग करून त्या पटनिश्चीतीप्रमाणे मुख्याध्यापक व अन्य शिक्षकांच्या संचमान्यतेनुसार नेमणुका केल्या जाणार असल्याचे संकेत आहेत.या मुळे सध्या असलेली मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षकपदे रद्द होणार असून अशा शिक्षकांना अन्य शाळांत जावे लागेल. यामुळे अनेक मुख्याध्यापक व शिक्षक कमी होणार आहेत .पूर्वी १ ली ते ७ वी इयत्तेच्या शाळेवर पटाचा विचार न करता मुख्याध्यापक पद देण्यात येत असे. हे मुख्याध्यापक वर्ग अद्यापनासह शालेयव्यवस्थापन सांभाळीत असत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये रोज नवीन येणाऱ्या परिपत्रकामुळे मुख्याध्यापकाचे काम वाढले आहे.मुख्याध्यापक पद आवश्यक असतांना पटाचीअट घातल्याने अनेक शाळातून ही पदे रद्द होणार आहेत. इंग्रजी शाळांचे पेव गावोगावी झाल्याने मराठी शाळांची पटसंख्या कमी होत आहे. याचा विचार न करता मुख्याध्यापक पदाला कात्री लावली जात आहे असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.पूर्वीच्या संरचनेनुसार १ ली ते ७ वी किंवा नवीन रचनेनुसार १ ली ते ८ वी चा पट १५० विद्यार्थी असतील तर तेथे मुख्याध्यापक पद भरले जात होते.