शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

इंदोरीकरप्रकरणी वंचित आघाडीचे बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 5:24 AM

वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे आणि अ‍ॅड. राजय गायकवाड यांनी गुरुवारपासून ठाण्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ठाणे : भारतीय संविधानातील आरक्षणाच्या तरतुदी आणि चर्मकार समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी लेखी फिर्याद करून सहा दिवसांनंतरही ह.भ.प. इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल न केल्याचा आरोप करून वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे आणि अ‍ॅड. राजय गायकवाड यांनी गुरुवारपासून ठाण्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शासकीय विश्रामगृहासमोर ते या बेमुदत उपोषणास बसले आहेत. इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला. या कीर्तनातील वक्तव्याविरोधात चव्हाण यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यासंदर्भात चौकशी करून दोन दिवसांत संविधानाचा अवमान आणि दलितांविरोधात चिथावणी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्तांनी २९ फेब्रुवारीला दिले. सहा दिवसांनंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही किंवा इंदोरीकर जाहीर माफी मागत नाहीत. तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराज