Increase of 668 corona patients in Thane district | ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ६६८ रुग्णांची वाढ

जिल्ह्यात आता दोन लाख ६४ हजार ९१८ रुग्णांची नोंद

ठळक मुद्देजिल्ह्यात आता दोन लाख ६४ हजार ९१८ रुग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्हयामध्ये रविवारी कोरोनाचे ६६८ रु ग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन लाख ६४ हजार ९१८ रु ग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात चार रु ग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सहा हजार २७२ इतकी झाली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात २८ फेब्रुवारी रोजी २११ कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याने येथील
रु ग्णसंख्या आता ६२ हजार ३४० इतकी झाली आहे. शहरात एकाच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूंची संख्या एक हजार ३८६ झाली आहे. नवी मुंबईमध्ये १३५ रु ग्ण आढळले असून दोघांचा मृत्यु झाला आहे. कल्याण-डोंबिवलीत १७८ रु ग्णांची वाढ झाली तर दोघांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये दहा रु ग्ण आढळले. तर भिवंडीत ११ बाधित झाले असून एकाही मृत्यूची नोंद नाही. मीरा-भार्इंदरमध्ये ४२, अंबरनाथमध्ये २४ तर बदलापूरमध्ये ३२ रु ग्णांची नोंद झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये २५ रु ग्णांची वाढ झाली आहे. सुदैवाने एकही मृत्यु झालेला नाही. आतापर्यंत बाधित १९ हजार ५५२ तर ५९३ मृत्यु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Increase of 668 corona patients in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.