शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०७९ रुग्णांची वाढ; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 1:05 AM

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३८८ रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरात २९ हजार ८५१ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. शनिवारी तर तब्बल दोन हजार ७९ रुग्णांची नव्याने वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या एक लाख ४४ हजार १७२ झाली आहे. तर, २६ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या आता तीन हजार ८९३ झाली आहे.ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात ३८८ रुग्ण नव्याने आढळले आहेत. शहरात २९ हजार ८५१ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. तर, चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे ८८९ मृत्यूची नोंद झाली. कल्याण-डोंबिवली परिसरात ५७८ रुग्णांची वाढ झाली.उल्हासनगर महापालिका परिसरात तीन मृत्यूंसह ३९ नवे रुग्ण आढळले. भिवंडी महापालिका क्षेत्रात ४० बाधित आढळले, तर एकाचाही मृत्यू झाला नाही.आता बाधितांची संख्या चार हजार ४७४ झाली असून मृतांची संख्या २९५ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये २४७ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर मृतांचा आकडा ४६८ वर पोहोचला आहे.अंबरनाथमध्ये ५० रुग्णांसह एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या पाच हजार ४४६, तर मृतांची संख्या २०४ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ९२ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या चार हजार ९२० झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात २६४ रुग्णांची वाढ झाली, तर दोघांचा मृत्यू झाला. आता बाधितांची ११ हजार २५७ आणि मृतांची संख्या ३३८ झाली आहे.नवी मुंबईत ३० हजारचा टप्पा पूर्णनवी मुंबई : शहरात शनिवारी ३८१ रूग्ण वाढले असून एकूण रूग्णांची संख्या ३०२९५ झाली आहे. उपचारादरम्यान दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये १ लाख ५८ हजार १५ जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यापैकी ८१ टक्के अहवाल निगेटीव्ह आले आहेत. दिवसभरात ३५९ रूग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २६१३५ झाली आहे.रायगड जिल्ह्यात आढळले ८९३ रूग्णअलिबाग : जिल्ह्यात शनिवारी ८९३ नव्या कोरोना पॉझिटीव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ३६ हजार ३४३ वर पोचली आहे. दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत एकूण ९८८ जणांना मृत्यूने कवटाळले आहे. आतापर्यंत २८ हजार ९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.वसई-विरारमध्ये२५९ नवीन रुग्णवसई : वसई-विरार शहरात शनिवारी दिवसभरात २५९ नवे रुग्ण आढळून आले असून २०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर तीन रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झाला आहे, अशी माहिती महापालिकेने दिली. महापालिका हद्दीत आता एकूण रुग्णसंख्या १९ हजार १६६ वर पोहोचली आहे. तर एकूण मुक्त रुग्णांची संख्या १६ हजार ६९९ इतकी झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे