उल्हासनगरात संततधार पाऊस, ४ झाडे व १ भिंत पडली एक कार व दुचाकीचे नुकसान, एक साप मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 20:04 IST2022-07-01T20:04:09+5:302022-07-01T20:04:27+5:30
सदानंद नाईक उल्हासनगर : शहरात संततधार पावसाने चार जुनी झाडे कोसळली.तहसील समोर एक जुने झाड कार व दुचाकीवर पडल्याने ...

उल्हासनगरात संततधार पाऊस, ४ झाडे व १ भिंत पडली एक कार व दुचाकीचे नुकसान, एक साप मिळाला
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरात संततधार पावसाने चार जुनी झाडे कोसळली.तहसील समोर एक जुने झाड कार व दुचाकीवर पडल्याने त्यांचे नुकसान झाले. तर कॅम्प नं-४ मध्ये एक साप सापडला असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याची घटना घडली आहे.
उल्हासनगरात रात्री पासून संततधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी नाले तुंबून पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. दुपारी तहसील कार्यालयासमोर एक जुने झाड कार व एका दुचाकीवर पडून त्यांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच शहरातील इतर ठिकाणी ३ झाडे पडल्याची व ओटी सेक्शन येथे एका घराची भिंत पडल्याची घटना घडली, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांनी दिली.
कॅम्प नं-४ ठिकाणी एक साप आढळून आल्याने नेटके म्हणाले. मयूर हॉटेल, गुलशननगर, स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील रस्ता, कॅम्प नं-३ येथील मार्केट आदी ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत.