भिवंडीत निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट कोसळली; दोन कामगारांचा मृत्यू

By नितीन पंडित | Updated: November 23, 2022 19:53 IST2022-11-23T19:52:51+5:302022-11-23T19:53:15+5:30

भिवंडीत निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट कोसळून दोन कामरागांची मृत्यू झाला. 

In Bhiwandi, two workers were killed when an under-construction building lift collapse | भिवंडीत निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट कोसळली; दोन कामगारांचा मृत्यू

भिवंडीत निर्माणाधीन इमारतीची लिफ्ट कोसळली; दोन कामगारांचा मृत्यू

भिवंडी : शहरातील मिल्लत नगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. जलालूद्दीन खान वय २४ व ओमप्रकाश गौतम वय ४१ अशी मृत कामगारांची नावे आहेत. शहरातील वंजारपट्टी मिल्लत नगर येथे टोलेजंग १४ मजली अंबर हाईट इमारात उभारणीचे काम सुरू असून त्याठिकाणी बुधवारी कामगार काम करीत असताना तळमजल्या वरून इमारतीच्या वरच्या मजल्यावर कामासाठी लिफ्टने जात असताना सातव्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली कोसळली.

या दुर्घटनेत या दोन्ही कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर इतर कामगारांनी जखमी कामगारांना शासकीय रुग्णालयात घेऊन आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात उशिराने आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

  

 

Web Title: In Bhiwandi, two workers were killed when an under-construction building lift collapse