भिवंडीत रागाच्या भरात पतीने पत्नीला चाकूने भोसकले

By नितीन पंडित | Updated: March 27, 2024 17:01 IST2024-03-27T17:00:37+5:302024-03-27T17:01:20+5:30

नितीन पंडित भिवंडी: घर कामासाठी बाहेर पडलेल्या पत्नीला रस्त्यावर अडवून शिवीगाळ व मारहाण करत रागाच्या भरात पत्नीच्या बरगड्यात पतीने ...

In Bhiwandi, the husband stabbed his wife with a knife in a fit of rage | भिवंडीत रागाच्या भरात पतीने पत्नीला चाकूने भोसकले

भिवंडीत रागाच्या भरात पतीने पत्नीला चाकूने भोसकले

नितीन पंडित

भिवंडी: घर कामासाठी बाहेर पडलेल्या पत्नीला रस्त्यावर अडवून शिवीगाळ व मारहाण करत रागाच्या भरात पत्नीच्या बरगड्यात पतीने चाकू खूपसल्याची धक्कादायक घटना भिवंडीत समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी भोईवाडा पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोशन खातून मुस्ताक अहमद अन्सारी वय ४० वर्ष राहणार धामणकर नाका, पटेल कंपाऊंड असे पतीच्या मारहाण व चाकूहल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. सदर महिला २५ मार्च रोजी घर कामासाठी बाहेर निघाली असता तिला पती मुश्ताक अहमद जाकीर अन्सारी वय ४६ वर्ष याने रस्त्यात अडवून तिला शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी पत्नी रोशन खातून ही पतीच्या तावडीतून सुटून पळून जात असताना पतीने तिला पकडून जमिनीवर पाडले व पतीने आपल्या कमरेला असलेला चाकू पत्नी रोशन खातून हिच्या डाव्या बाजूच्या बरगडीत खूपसले. जखमी अवस्थेत पत्नी रोशन खातून हिला मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दवा उपचार घेत असताना भोईवाडा पोलिसांनी जखमी रोशन हिचा जबाब नोंदवत मंगळवारी पती विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीस अटक केली आहे.
 

Web Title: In Bhiwandi, the husband stabbed his wife with a knife in a fit of rage