भिवंडीत शुल्लक कारणाने तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार 

By नितीन पंडित | Updated: March 30, 2024 15:16 IST2024-03-30T15:15:46+5:302024-03-30T15:16:23+5:30

शुभम झा, हर्ष मिश्रा, गणेश मारुती शिंदे उर्फ गणू व त्यांच्या सोबतचा एक अनोळखी इसम सर्व रा. गांधीनगर कामतघर असे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.

In Bhiwandi, a young man was stabbed on the head with a spear | भिवंडीत शुल्लक कारणाने तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार 

भिवंडीत शुल्लक कारणाने तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार 


भिवंडी : शिल्लक कारणातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील पारसनाथ कंपाऊंड परिसरात शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        शुभम झा, हर्ष मिश्रा, गणेश मारुती शिंदे उर्फ गणू व त्यांच्या सोबतचा एक अनोळखी इसम सर्व रा. गांधीनगर कामतघर असे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. तर नितीन नागप्‍पा नवले वय १८ वर्ष रा. गणेश नगर, कामतघर असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी नितीन हा आपला मित्र विक्रम नायक वय १८ वर्षे व रोहित कुशवाह व १९ वर्ष असे तिघेजण कामावरून घरी येत असताना आरोपी शुभम झा व त्याच्या इतर साथीदारांनी नितीन यास राज शहा यांच्यासोबत फिरण्यास मनाई केली असतानाही, तू त्याच्याबरोबर फिरतो या गोष्टीचा राग मनात धरत हर्ष मिश्रा याने नितीन यास पकडून ठेवत शुभम झा याने त्याच्याकडील कोयत्याने नितीनच्या डोक्यावर गंभीर दुखापत केली.

तसेच गणू याने विक्रम नायकच्या दिशेने कोयता फेकून मारला तर रोहित कुशवाह यास देखील शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. या मारहाण व हल्ल्या प्रकरणी नितीन नवले याने नारपोली पोलीस ठाण्यात शुभम झा, हर्ष मिश्रा व त्याचे साथीदार अशा चौघांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: In Bhiwandi, a young man was stabbed on the head with a spear