शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

शहरसौंदर्य वाढवण्यासाठी ठामपाचे नवे धोरण, ठामपा आयुक्तांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 12:22 AM

ठाणे शहरात किती क्षेत्रामध्ये अन् कोणत्या आकाराचे होर्डिंग लावता येतील, तसेच यामुळे नागरिकांच्या दृष्टीस अडथळा न येता शहरसौंदर्य वाढविणारे तसेच नीटनेटके पदपथ बांधून शहराचे पर्यटनमूल्य वाढेल,

ठाणे : ठाणे शहरात किती क्षेत्रामध्ये अन् कोणत्या आकाराचे होर्डिंग लावता येतील, तसेच यामुळे नागरिकांच्या दृष्टीस अडथळा न येता शहरसौंदर्य वाढविणारे तसेच नीटनेटके पदपथ बांधून शहराचे पर्यटनमूल्य वाढेल, असे ठाणे महापालिकेचे नवे जाहिरात धोरण तयार करण्यात येणार आहे. यासाठी तीन विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या असून त्यांना अवघ्या एका आठवड्यात आपला मसुदा सादर करण्याचे आदेश सोमवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले.ठाणे महानगरपालिकेच्या वतीने २००३ च्या शासन जाहिरात धोरणानुसार जाहिरातफलक उभारणीस परवानगी देण्यात येते. यापुढे जाहिरातफलक लावण्यासाठी परवानगी देताना शहराच्या सौंदर्यास बाधा येणार नाही, अशा पद्धतीने परवानगी देणे, किती क्षेत्रफळामध्ये आणि किती आकाराचे होर्डिंग उभे करता येईल, किती अंतरावर त्याची परवानगी देता येईल, याबरोबरच न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करणे, नागरिकांच्या दृष्टीस अडथळा होणार नाही, याची दक्षता घेणे, असे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येणार आहे. यासाठी उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले आणि कार्यकारी अभियंता शहर विकास भेंडाळे यांची समिती नेमण्यात आली आहे.>सांस्कृतिक अन् कला महोत्सवांना देणार चालनाशहराचे पर्यटनमूल्य वाढावे यासाठी काय करता येईल, याचा अहवाल तयार करण्याचे आदेश देताना शहरामध्ये होणारे सांस्कृतिक तसेच विविध कला महोत्सव, महत्त्वाची ठिकाणे, पार्क आदींबाबत नागरिकांना सहज माहिती मिळावी, यासाठी काय करता येईल, याचाही मसुदा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये उपायुक्त संदीप माळवी, नगर अभियंता रवींद्र खडताळे आणि कार्यकारी अभियंता मोहन कलाल या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.पदपथांचे सौंदर्य वाढविणारसुलभ पदपथ बनविण्यासाठी आवश्यक धोरण तयार करण्यासाठी अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे यांच्या अधिपत्याखाली रामदास शिंदे आणि विकास ढोले यांची समिती नियुक्त केली आहे. यात पदपथांच्या सौंदर्याबरोबरच ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यात येणार आहे.