भिवंडीत दिड दिवसांच्या बापांचे विसर्जन

By नितीन पंडित | Updated: September 20, 2023 21:33 IST2023-09-20T21:29:54+5:302023-09-20T21:33:12+5:30

मनपा प्रशासनाच्या वतीने गाजंगी हॉल व वऱ्हाळादेवी तलावाच्या पायथ्याशी तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये देखील गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्त्यांचे विसर्जन केले.

Immersion of ganesha for one and a half days in Bhiwandi | भिवंडीत दिड दिवसांच्या बापांचे विसर्जन

भिवंडीत दिड दिवसांच्या बापांचे विसर्जन

भिवंडी : भिवंडीत शहर व ग्रामीण भागात दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन बुधवारी सायंकाळी करण्यात आले. ग्रामीण भागात असलेल्या तलावांमध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर शहरात नदी नाका विसर्जन घाटाबरोबरच, वऱ्हाळदेवी तलावा,नारपोली तलाव आदी विसर्जन घाटांवर मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मनपा प्रशासनाच्या वतीने गाजंगी हॉल व वऱ्हाळादेवी तलावाच्या पायथ्याशी तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये देखील गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्त्यांचे विसर्जन केले.

       विसर्जन घाटांवर गणेश भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मनपा प्रशासनाने योग्य ती व्यवस्था विसर्जन घाटांवर करण्यात आली होती. तर शहरात पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.शरतील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक यंत्रणा सतर्क होती.
 

Web Title: Immersion of ganesha for one and a half days in Bhiwandi