उल्हासनगरातील स्काय डोम हॉलच्या वाढीव काम जमीनदोस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:17 IST2025-07-01T18:14:26+5:302025-07-01T18:17:30+5:30
उल्हासनगर शांतीनगर प्रवेशद्वार येथे स्काय डोम हॉल बांधण्यात आला आहे.

उल्हासनगरातील स्काय डोम हॉलच्या वाढीव काम जमीनदोस्त
उल्हासनगर : कॅम्प नं-४, शांतीनगर येथील स्काय डोम हॉलचे वाढीव साडे तीन हजार चौ मीटरच्या अवैध बांधकामावर महापालिका अतिक्रमण विभागाने पाडकाम कारवाई सुरु केल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. एका वर्षांपूर्वी बांधकामाला नोटीस दिली होती. मात्र प्रकरण न्यायालयात गेल्याने, कारवाईला दिरंगाई झाल्याचे शिंपी म्हणाले.
उल्हासनगर शांतीनगर प्रवेशद्वार येथे स्काय डोम हॉल बांधण्यात आला आहे. मात्र विनापरवाना साडे तीन हजार चौ.मी. चे बांधकाम वाढीव झाल्याची तक्रार नगररचनाकार विभागाला मिळाली होती. तत्कालीन सहाय्यक संचालक नगररचनाकार ललित खोब्रागडे यांनी बांधकाम कारवाईचे आदेश अतिक्रमण विभागाला दिले होते. त्यानंतर अतिक्रमण विभागाने स्काय डोम हॉलच्या वाढीव बांधकामाला नोटीस बजावली. दरम्यान हॉल मालक न्यायालयात गेल्याने, हॉलच्या वाढीव बांधकामावरील कारवाई रेंगाळली होती. वाढीव बांधकाम नियमित नं झाल्याने, मंगळवारी महापालिका अतिक्रमण विभागाने तब्बल साडे तीन हजार चौ.मी. अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई सुरु केली. पाडकाम कारवाईला दोन दिवस लागणार असेल्याचे शिंपी म्हणाले.
शहरांत रिक्सबेस बांधकाम परवान्याच्या नावाखाली शहरांत बहुमजली आरसीसी बांधकामे होत असून खत्री भवन येथील चार मजली बांधकाम सध्यास्थित चर्चेत आले. महापालिका आयुक्तानी शहरात उभ्या राहत असलेले बांधकाम व नगररचनाकार विभागाने परवाना दिलेल्या बांधकामाचे सर्वेक्षण केल्यास, मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राजकीय नेत्याचे नातेवाईक, कार्यकर्ते, पदाधिकारी हेच महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्रासपणे अवैध बांधकामात करीत आहेत. असी चर्चा शहरांत रंगली आहे. आयुक्तानी याकडे लक्ष दिल्यास, अवैध बांधकामाचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे.