'काहीही अडचण वाटली, तर मला कधीही फोन करा'; खासदाराने दिला माजी महापौरांना धीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 06:46 IST2020-08-28T00:43:12+5:302020-08-28T06:46:11+5:30

डॉ. शिंदे त्यांना म्हणाले की, ‘तमाम शिवसैनिकांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली चौकशी केली आहे.

"If you have any problem, call me anytime"; the MP reassured the former mayor | 'काहीही अडचण वाटली, तर मला कधीही फोन करा'; खासदाराने दिला माजी महापौरांना धीर 

'काहीही अडचण वाटली, तर मला कधीही फोन करा'; खासदाराने दिला माजी महापौरांना धीर 

कल्याण : कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांच्यावर निऑन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी पीपीई किट घालून रुग्णालयात जाऊन देवळेकर यांची भेट घेत त्यांना धीर दिला.

यावेळी डॉ. शिंदे त्यांना म्हणाले की, ‘तमाम शिवसैनिकांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आपली चौकशी केली आहे. शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवीही आता बरे झाले आहेत. तुम्हीही काही काळजी करू नका. तुम्हीसुद्धा लवकर बरे होणार आहात. माझे डॉक्टरांशी बोलणे सुरू आहे. काहीही अडचण वाटली, तर मला कधीही फोन करा.’ दरम्यान, डॉ. शिंदे यांच्या या धीर देणाऱ्या शब्दांनी देवळेकर यांना गहिवरून आले. मागील आठवड्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपीई किट घालून कोविड वॉर्डात जाऊन साळवी यांची विचारपूस केली होती.

Web Title: "If you have any problem, call me anytime"; the MP reassured the former mayor