शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

आयसीएसईच्या विद्यार्थ्यांची अर्जात बदल करण्यासाठी धावपळ, नव्या जीआरमुळे फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 2:34 AM

आयसीएसई बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावीसाठी राज्य सरकारच्या बोर्डाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असल्याने त्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण (फर्स्ट फाइव्ह) ग्राह्य धरले जाणार आहेत.

- जान्हवी मोर्येडोंबिवली - आयसीएसई बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावीसाठी राज्य सरकारच्या बोर्डाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असल्याने त्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण (फर्स्ट फाइव्ह) ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे आॅनलाइन अर्जात बदल करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. विद्यार्थ्यांनी सेंटरला भेट देऊन आपल्या अर्जातील पहिल्या भागात बदलण्यास सुरुवात केली आहे. कल्याणच्या मुथा महाविद्यालयातील सेंटरमध्ये शनिवारी १०० विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जात बदल केल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रुती वाईकर यांनी दिली.सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांची विषयांची संख्या तसेच गुणपद्धती राज्यातील बोर्डापेक्षा वेगळी आहे. मात्र, राज्य सरकारने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार अकरावीत प्रवेशासाठी आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण ग्राह्य धरताना पहिल्या पाच विषयांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यापूर्वी गुणपत्रिकेवरील सहा विषयांपैकी सरासरीसाठी पाच सर्वोत्तम (बेस्ट फाइव्ह) विषयांचे गुण धरले जात होते. मात्र, याविषयीची माहिती शाळांपर्यंत पोहोचलेली नाही.आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आधीच भरले असल्याने त्यांना आता गुणपत्रिकेतील गुण बदलण्यासाठी पुन्हा अर्जाचा पहिला भाग भरावा लागत आहे. त्यामुळे आपोआपच भाग दोनही भरावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी सेंटरकडे धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी डोंबिवलीत पूर्वेत के.बी. वीरा शाळा आणि पश्चिमेत साउथ इंडियन हायस्कूलमध्ये तर, कल्याणमध्ये मुथा महाविद्यालयात केंद्र ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अर्जात बदल करणे सोयीचे जावे, यासाठी रविवारी सकाळी १० ते ३ ही केंद्रे खुली असणार आहेत. २५ जूनला अकरावी प्रवेशाची बायफोकलची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. तोपर्यंत ही प्रक्रि या पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शुक्रवारी फॉर्ममध्ये बदल केला. तर, सर्वसाधारण गुणवत्ता यादी १ जुलैला जाहीर होणार आहे.हा निर्णय चुकीचा!ओमकार इंटरनॅशनल आयसीएसई स्कूलच्या संस्थापिका दर्शना सामंत म्हणाल्या, यंदाच्या वर्षी राज्य मंडळाने अंतर्गत गुण बंद केले आहेत. त्यामुळे इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशही सरासरी गुणांच्या आधारे व्हावा, असे बोलत आहे. पण, मुळातच या बोर्डाच्या अभ्यासक्रमाची पातळी कठीण असते. त्या तुलनेत राज्यातील बोर्डाची नाही. मग, असे असतानाही आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी चुकीचा निर्णय घेतला गेला आहे. यासंदर्भातील लेखी जीआर आमच्यापर्यंत अजून पोहोचला नाही. पण, सरासरी गुणांच्या आधारे प्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रthaneठाणे