I got Shivsena's offer Before the election: Shivendra Raje | निवडणुकीपूर्वी शिवसेनेची ऑफर होती; शिवेंद्रराजेंचा ठाण्यात गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांनीच दिली होती आॅफर

ठळक मुद्देएकनाथ शिंदे यांनीच दिली होती आॅफरकामांच्या निमित्ताने शिंदे यांच्याशी जवळीक आली शिंदेची आॅफर येण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांशी झाली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेत येण्याची आपल्याला आॅफर होती, असा गौप्यस्फोट जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ठाण्यात केला. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात शिवसेनेच्या प्रचारासाठी ते रविवारी ठाण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्त व्य केले.
शिवेंद्रराजेंना कोणता पक्ष शोभतो, असे म्हणत त्यांनी शिवसेनेत असायला हवे होते, असे वक्तव्य शिंदे यांनी ग्रेट जावळी महाबळेश्वर प्रतिष्ठानने आयोजित मेळाव्यात केले. त्याच अनुषंगाने त्यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे यांनी हा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, सातारा जिल्ह्यातील अनेक कामे घेऊन आपण शिंदे यांच्याकडे जात होतो. तेव्हा त्यांनी शिवसेनेत येण्याचीही आॅफर दिली होती. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आधीच चर्चा झालेली असल्यामुळे आपण भाजपचा मार्ग पत्करल्याचेही ते म्हणाले. यावेळी शिंदे यांचे भाऊ नगरसेवक प्रकाश शिंदे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच जावळी आणि सांगली येथील रहिवासी उपस्थित होते.

Web Title: I got Shivsena's offer Before the election: Shivendra Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.