आयात धोरणामुळे कारखानदारी अडचणीत-- शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 10:10 PM2017-09-28T22:10:02+5:302017-09-28T22:10:02+5:30

सातारा : ‘केंद्र सरकारने साखर आयात करण्याचे धोरण अवलंबले आहे.

Factory problems due to import policy - Shivendra Singh Bhojle | आयात धोरणामुळे कारखानदारी अडचणीत-- शिवेंद्रसिंहराजे भोसले

आयात धोरणामुळे कारखानदारी अडचणीत-- शिवेंद्रसिंहराजे भोसले

Next
ठळक मुद्देअजिंक्यतारा कारखान्याची ३५ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘केंद्र सरकारने साखर आयात करण्याचे धोरण अवलंबले आहे. साखर आयात केल्यास त्याचे विपरित परिणाम साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकºयांवर होणार आहेत. सरकारचे हे धोरण सहकारी साखर कारखान्यांना मारक असून, त्याचा भुर्दंड ऊस उत्पादक शेतकºयांना सोसावा लागणार आहे,’ असे मत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.
शेंद्रे येथील कारखान्याची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव सावंत होते. उपाध्यक्ष विश्वास शेडगे, कारखान्याचे सर्व संचालक यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती होती.

कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी विषयवाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमुखी मंजुरी दिली. कारखान्याचे विस्तारीकरण ५ हजार मेट्रिक टन करण्याचा ठराव सभासदांनी मांडला. यावेळी पोलिस निरीक्षक भास्कर कदम, अजित साळुंखे यांच्यासह उच्चांकी हेक्टरी उत्पादन घेणाºया मोहन कदम, पांडुरंग सणस, गणेश भोसले, सदाशिव माने, संभाजी घोरपडे, दिलीप शिंदे, गजानन साळुंखे, संतोष माने, सुनील यादव, अरविंद घोरपडे, सुरेश चव्हाण, मंगल कणसे, प्रकाश चव्हाण, कल्याण रसाळ, पापालाल मोकाशी, रामचंद्र शेडगे, विठ्ठलराव माने, राजकुमार माने, शशिकांत नलवडे या शेतकºयांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास चंद्रकांत जाधव, सभापती सतीश चव्हाण, किरण साबळे-पाटील, शिवाजीराव चव्हाण, मिलिंद कदम, जितेंद्र सावंत, अरुणा शिर्के, राहुल शिंदे, रवींद्र कदम, अण्णाबापू सावंत, धर्मराज घोरपडे, बेबीताई जाधव, दादा शेळके, अरविंद चव्हाण, सूर्यकांत धनवडे, सूत गिरणीचे अध्यक्ष रामचंद्र जगताप, हणमंत देवरे, गणपतराव शिंदे, अ‍ॅड. विक्रम पवार, बाळकृष्ण साळुंखे, लक्ष्मण कदम, गणपतराव मोहिते, प्रकाश बडेकर, लालासाहेब पवार, छाया कुंभार आदी उपस्थित होते.

Web Title: Factory problems due to import policy - Shivendra Singh Bhojle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.