शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

 दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची मला सवय नाही, आव्हाडांचा नाईकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 19:23 IST

प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतो. त्यामुळे गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण याचा अर्थ मी आणखी खालच्या पातळीवर उतरावं असा होत नाही.

ठाणे -  काही महिन्यांवर आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजपा नेते गणेश नाईक यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नाईक यांच्यावर टीका केल्यानंतर तेरे बस की बात नही तेरे बापको बोल असे प्रतिआव्हान दिले होते. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे.  दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची मला सवय नाही, असा टोला त्यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे.

‘प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतो. त्यामुळे गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण याचा अर्थ मी आणखी खालच्या पातळीवर उतरावं असा होत नाही. उलट मला त्यांची दया आली. आमच्या पक्षात असताना ज्या माणसाचा इतका रुबाब होता, त्याच्यावर आता एखादा अट्टल दारूडा चारचौघात जशी शिवीगाळ करतो तशी वेळ त्यांच्यावर का आली, याचा गांभीर्याने विचार करण्याची नवी मुंबईकरांना आवश्यकता आहे,’ असे आव्हाड म्हणाले.

संबंधित बातम्या 

दिल्लीप्रमाणे मुंबईतही दंगल घडावी अशी भाजपची मानसिकता होती : आव्हाड

गणेश नाईकांना पुन्हा डिवचले, जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

'गणेश नाईकांचा छा...छैया बघायला तयार राहा'; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल     

दरम्यान, ‘नवी मुंबई ही नवी मुंबईच राहिली पाहिजे. ती नाईक मुंबई बनता कामा नये. आज ते थेट विरोधात असल्यामुळे माझ्यावर पक्षशिस्तीचं बंधन नाही, जे इतकी वर्ष होतं. माझ्या एका भाषणामुळे ते गटारी पातळीवर उतरले आणि त्यांनी थैय्या केला. आता मी त्यांना भरतनाट्यम, ट्विस्ट, डिस्को, झुंबा, आदिवासी डान्स, कोळी नृत्य, सालसा, लांबाडा, आणि आयटम नाचसुद्धा करायला लावणार आहे. नाहीतरी या पक्षातून त्या पक्षात नाचायची सवय त्यांना आहेच.मी येतोय गणेश नाईक. सराव सुरु करा. मी तुमचा बाप काढणार नाही. पण बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल म्हणून नक्कीच सांगणार,’असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसGanesh Naikगणेश नाईकBJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबई