'गणेश नाईकांचा छा...छैया बघायला तयार राहा'; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल    

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 10:38 PM2020-03-09T22:38:07+5:302020-03-09T22:39:07+5:30

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरून गणेश नाईक यांना आव्हान करण्याची पोस्ट शेअर केली आहे.

NCP leader jitendra awhad slams again BJP leader ganesh naik rkp | 'गणेश नाईकांचा छा...छैया बघायला तयार राहा'; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल    

'गणेश नाईकांचा छा...छैया बघायला तयार राहा'; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल    

Next

मुंबई : नवी मुंबईत महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. विशेषकरून महाविकास आघाडी आणि भाजपा नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे नेते गणेश नाईक यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवरून गणेश नाईक यांना आव्हान करण्याची पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणाले, "मी एकदा काय नवी मुंबईत जाऊन भाषण केलं, गणेश नाईकांनी कथकल्ली सुरू केली. अजून तर मी 100 वेळा जाणार आहे आणि त्याच्यानंतर माझा बापही येणार आहे. नवी मुंबईकरांनो गणेश नाईकांचा छा... छैया बघायला तयार राहा." यासोबतच एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. 

दरम्यान, याआधी जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक व नाईक कुटुंबीयांवर सडकून टीका केली होती. "मी अशा गद्दरांना विचारत नाही. जे बाळासाहेबांचे झाले नाही ते पवार साहेबांचे कसे होतील", असा शब्दांत जितेंद्र  आव्हाड यांनी गणेश नाईकांवर घणाघाती टीका केली होती. अर्थातच, जितेंद्र आव्हाड यांची बोचरी टीका गणेश नाईक यांना रुचली नाही. म्हणून, गणेश नाईक यांनीही तशाच भाषेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर प्रहार केला होता. 

'ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक,' असा डायलॉग मारत अभिनेते नाना पाटेकरस्टाईलने जितेंद्र आव्हाड यांना चॅलेंज केले. तसेच, गणेश नाईकला खंडणी बहाद्दर म्हणून आरोप केले जातात. पण, माझ्यावर साधी एक एनसीही दाखल नाही. हाथी चलता है अपनी चाल से... असे म्हणत गणेश नाईक यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. 
 

Web Title: NCP leader jitendra awhad slams again BJP leader ganesh naik rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.