बरवाडीतील वणव्यात आदिवासी कुटूंबाची झोपडी भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 16:25 IST2021-04-07T16:24:52+5:302021-04-07T16:25:12+5:30
उंबरवाडी या आदिवासी पाड्यातील एका गरीब आदिवासीचे घर आगीत जळून भस्मसात झाले.

बरवाडीतील वणव्यात आदिवासी कुटूंबाची झोपडी भस्मसात
शहापूर - तालुक्यातील अस्नोली ग्रुपग्रामंचायत अंतर्गत असणाऱ्या उंबरवाडी या आदिवासी पाड्यातील एका गरीब आदिवासीचे घरआगीत जळून भस्मसात झाले.मंगळवारी भर दुपारी लागलेल्या वणव्यात शेताजवळ असलेले हे झोपडीवजा घर अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने घरातील भांडी, कपडे, धान्य व पैसे यांची राख झाली आहे.
मंगळवारी अस्नोली-उंबरवाडीच्या टेकडीला भर दुपारीच लागलेल्या वणव्याने उग्र रुप धारण करत उंबरवाडी या आदिवासी पाड्यालाही गराडा घातला होता.त्यात शेताजवळ असलेले शरद हेमा ठोंबरे यांचे राहते घर जळाले असून भांडी, धान्य, कपडे व रोख रुपये ४० हजार असे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी १ ते २ च्या सुमारास ही घटना घडली असून घरात असणारी शरद ठोंबरे यांची पत्नी व दोन मुले सुरक्षित