उल्हासनगरमध्ये संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 12:51 IST2019-04-07T12:46:56+5:302019-04-07T12:51:00+5:30

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय घेणाऱ्या पतीने शनिवारी (6 एप्रिल) सायंकाळी साडे सात वाजता पत्नीची गळा दाबून हत्या केली.

Husband murders wife in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

उल्हासनगरमध्ये संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या

ठळक मुद्देपत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय घेणाऱ्या पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली. उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, घटनेचा पंचनामा केला. मुलीच्या तक्रारीवरून दीपक याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून फरार झालेल्या दिपकला रात्रीच अटक केली.

उल्हासनगर - पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय घेणाऱ्या पतीने शनिवारी (6 एप्रिल) सायंकाळी साडे सात वाजता पत्नीची गळा दाबून हत्या केली. हा सर्व प्रकार 13 वर्षाच्या मुलीसमोर झाला असून मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-1 मुकुंदनगर येथे प्लांबरचे काम करणारा दीपक पगारे पत्नी व मुलीसह राहत होता. घरी आर्थिक ओढाताण होऊ नये म्हणून, रेखा घरकाम करीत होती. त्यांना प्रतीक्षा नावाची 13 वर्षाची मुलगी आहे. काही दिवसांपासून पत्नी रेखावर अनैतिक संबंधाविषयी संशय घेतल्याने त्यांच्यात भांडणे नेहमीची झाली होती. शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता रेखा घरी आल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. यावेळी दीपक  याने रागाच्या भरात पत्नीचा गळा आवळून खून केला. हा सर्व प्रकार घरात असलेल्या 13 वर्षाच्या मुलीसमोर झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर, घाबरलेल्या दिपकने घरातून पळ काढला.

गुढीपाडव्याच्या दिवशी खुनाच्या प्रकारांने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, घटनेचा पंचनामा केला. तसेच मुलीच्या तक्रारीवरून दीपक याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून फरार झालेल्या दिपकला रात्रीच अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Husband murders wife in Ulhasnagar