कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

By पंकज पाटील | Updated: April 19, 2023 15:46 IST2023-04-19T15:45:50+5:302023-04-19T15:46:24+5:30

बदलापूरमध्ये कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

husband killed wife due to family dispute in badlapur | कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या

बदलापूर: बदलापूरमध्ये कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर महिलेचा मृतदेह घरात रक्ताच्या थारोळात सापडला असून पती हा हत्येच्या घटनेनंतर प्रसार झाला आहे.   

बदलापूरच्या शिरगाव परिसरात राऊत अर्केट या गृह संकुलामध्ये राजश्री भोसले ही आपला पती गणेश भोसले यांच्या सोबत राहत होती. त्यांना एक सहा वर्षाचा मुलगा देखील असून शाळेला सुट्टी पडल्याने हा मुलगा आपल्या आजीकडे राहण्यासाठी केला होता. दुसरीकडे राजश्री आणि गणेश यांची नियमित भांडणे होत असल्याने या भांडणाच्या रागातून गणेशने आपल्या पत्नीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी 11 वाजता हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात येतच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी राजश्री भोसले यांच्या मृतदेहाचा पंचनामा केला असून घडलेल्या घटनेनंतर तिचा पती गणेश हा फरार झाल्याने पोलिसांनी त्याच्यावरच संशय व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शेजारच्यांना विचारणा केली असा शेजारच्यानी देखील भोसले कुटुंबियांमध्ये सतत वाद घडत असल्याचे स्पष्ट केले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: husband killed wife due to family dispute in badlapur