शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

विकासकांसाठी २४७ वृक्षतोड मंजुरीची घाई; महामार्गाचे रुंदीकरण रखडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 12:59 AM

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा ५१७ वृक्षतोडीचा प्रस्ताव रोखला

ठाणे : एकीकडे ठाणे महापालिका वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे वृक्षतोडीला परवानगीही देत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. मंगळवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत विकासकांसाठी २४७ वृक्षतोडीला परवानगी दिली आहे. पिरामल इस्टेटचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाचा निर्णय आल्यानंतरच वृक्षतोड केली जावी, असेही यावेळी निश्चित करण्यात आले.नॅशनल हायवे अ‍ॅथोरीटी आॅफ इंडियाच्या अर्जानुसार वडपे ते माजिवडानाका रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

त्यासाठी महापालिका हद्दीत ५१७ वृक्ष तोडले जाणार आहेत. त्याचा प्रस्ताव समितीने रोखून धरला. जोपर्यंत या भागाची पाहणी केली जात नाही, तोपर्यंत परवानगी देणार नसल्याचे यावेळी सदस्यांनी स्पष्ट केले. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत पिरामल इस्टेट यांचे ६७, १३ आणि ८३ असे वृक्षतोडीचे तीन प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवले होते. पिरामलचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याअनुषगांने सदस्यांनी या तिन्ही विषयांना परवानगी दिली. न्यायालयाने निकाल दिल्यावरच वृक्षतोडीला परवानगी द्यावी, असे एकमत यावेळी सदस्यांचे झाले. दुसरीकडे शहराच्या विविध भागात उन्मळून पडलेल्या ४२ वृक्षतोडीचा प्रस्तावही यावेळी मंजूर करण्यात आला. आणखी एका विकासकाच्या प्रस्तावानुसार ६ वृक्षांच्या तोडीला परवानगी दिली आहे. याच विकासकाच्या अन्य एका प्रस्तावासासाठी ३६ वृक्षतोडीला परवानगी देण्यात आली आहे. ज्या विकासकांना वृक्षतोडीची परवानगी दिली आहे, त्यांच्याकडून वृक्षांचे पुनरोर्पनही केले जाणार आहे. त्यानुसार शहराच्या इतर भागात १८६ वृक्षांचे पुनरोर्पण करण्यात येणार आहे.आपल्याच नियमांना प्राधिकरणाचा हरताळविशेष म्हणजे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या नियमानुसार एका वृक्षाच्या बदल्यात पाच वृक्ष नव्याने लावणे अनिवार्य आहे. परंतु, मंगळवाच्या बैठकीत या नियमाचे पालन होताना कुठेही दिसून आले नाही. एका वृक्षाच्या बदल्यात पाच असा हिशोब केला तर २०५ वृक्षांच्या बदल्यात १०२५ वृक्षांचे पुनरोर्पण करणे अपेक्षित होते. परंतु, अवघ्या १८६ वृक्षांचे पुनरोर्पण करण्यात येणार आहे. मात्र, सदस्यांनी यास हरकत घेतलेली दिसली नाही.नॅशनल हायवे अ‍ॅथोरीटी आॅफ इंडियाच्या अर्जानुसार मौजे वडपे ते माजिवडानाक्यापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये १२०० च्या आसपास वृक्ष बाधीत होणार आहे. त्यातील महापालिका हद्दीत ५१७ वृक्षआहेत. यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर होता. परंतु, या वृक्षांचे पुर्नरोपण कुठे केले जाणार, असा सवाल सदस्यांनी केला होता. या रस्त्याची पाहणी केल्याशिवाय परवानगी देणे योग्य ठरणार नसल्याचेही सदस्यांचे मत झाले. त्यामुळे आता आठवडाभरात सदस्य या भागाची पाहणी करणार असून त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे निश्चित केले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका