A huge fire broke out at a biosense company in Thane, and all employees were evacuated | ठाण्यातील बायोसेंस कंपनीला भीषण आग, सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप काढले बाहेर 

ठाण्यातील बायोसेंस कंपनीला भीषण आग, सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप काढले बाहेर 

ठळक मुद्देकंपनीतून सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 

ठाण्यातील बायोसेंस  कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. ठाणे महागनरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रात असलेल्या प्रशांत स्वीट कॉर्नरच्या गोडाऊनजवळ बायोसेंस ही कंपनी आहे. आग लागली असल्याची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाचे जवान, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापना विभागाचे अधिकारी, वागळे इस्टेट पोलिसांचे पथक, रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचले आहेत. कंपनीतून सर्व कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 

Read in English

Web Title: A huge fire broke out at a biosense company in Thane, and all employees were evacuated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.