ठाण्यातील घरात चोरी करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 23:13 IST2020-12-20T23:09:44+5:302020-12-20T23:13:19+5:30
ठाण्यातील आझादनगर येथील बालिका नाडार यांच्या घरात चोरी करणाºया प्रशांत शास्त्री (रा. आझादनगर, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे.

१२ हजारांची रोकड हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आझादनगर येथील बालिका नाडार यांच्या घरात चोरी करणाºया प्रशांत शास्त्री (रा. आझादनगर, ठाणे) याला कापूरबावडी पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. त्याच्याकडून १२ हजारांची रोकड हस्तगत केल्याची माहिती
सूत्रांनी दिली.
आझादनगर येथील पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ राहणाºया बालिका (४०) यांच्या घराची कढी काढून १२ हजारांची रोकड आणि दहा हजारांची चार ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी चोरीस गेल्याची घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या दरम्य्यान घडली होती. याप्रकरणी नाडार यांनी दिलेल्या तक्र ारीवरून प्रशांत शास्त्री याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक वाघ यांच्या पथकाने प्रशांत याला संशयावरुन ताब्यात घेतले. चौकशीत त्याने या चोरीची कबूली दिली. चोरीतील १२ हजारांची रोकडही त्याने दिल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.