पान सुपारीचे दुकान फोडून चोरी करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 23:37 IST2021-06-17T23:36:26+5:302021-06-17T23:37:13+5:30

पान, सुपारी आणि सिगारेट विक्रीचे दुकान फोडून ८०० रुपयांच्या रोकडसह सहा हजार ६६४ रुपयांचा मुद्देमाल चोरणाºया विजय गंगाधर सोनवणे या सराईत चोरटयाला वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे.

Home burglar burglar arrested | पान सुपारीचे दुकान फोडून चोरी करणाऱ्यास अटक

वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पान, सुपारी आणि सिगारेट विक्रीचे दुकान फोडून ८०० रुपयांच्या रोकडसह सहा हजार ६६४ रुपयांचा मुद्देमाल चोरणाºया विजय गंगाधर सोनवणे या सराईत चोरटयाला वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा ऐवजही जप्त केला आहे.
वागळे इस्टेट नेहरुनगर एचडीएफसी बँकेसमोररील स्वाद पान शॉप या अब्दुल शेख (२३, रा. अंबिकानगर, वागळे इस्टेट, ठाणे) या दुकानात चोरटयाने १५ जून रोजी रात्री ९.३० ते १६ जून रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास शटरचे लॉक तोडून शिरकाव केला. या दुकानातून रोकडसह सिगारेटची पाकिटे आणि इतर सामान लंपास केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रावते आणि एस. आर. विनेरकर यांच्या पथकाने विजय सोनवणे याला खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अटक केली. अगदी अलिकडेच तो अशाच एका चोरीच्या गुन्हयात जामीनावर सुटला होता, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Home burglar burglar arrested