मनसेची शहीद कुटुंबीयांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 10:01 IST2019-02-22T09:59:58+5:302019-02-22T10:01:41+5:30
प्रल्हाद म्हात्रे ह्यांनी रविवार १७ फेब्रुवारी रोजी मनसे ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन दरम्यान पुलवामा तेथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्यात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले

मनसेची शहीद कुटुंबीयांना मदत
डोंबिवली- मनसेचे कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन सदस्य व शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे ह्यांनी रविवार १७ फेब्रुवारी रोजी मनसे ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन दरम्यान पुलवामा तेथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्यात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले, त्या दोन्ही शहिदांच्या कुटुंबीयांना 51 हजारांची आर्थिक मदत म्हणून जाहीर केली होती, ती मदत काल २२ फेब्रुवारी रोजी विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात प्रत्यक्ष जाऊन प्रल्हाद म्हात्रे यांनी शहीद वीरपुत्रांच्या कुटुंबीयांच्या हातात सुपूर्त केली, ह्या प्रसंगी त्यांचे सोबत मनसे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष मदन गायकवाड उपस्थित होते.