शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
5
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
6
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
7
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
8
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
9
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
10
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
11
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
12
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
13
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
14
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
15
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
16
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
17
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
18
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
19
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
20
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल

शेतकरी उद्योजकाने खरेदी केले हेलिकॉप्टर, शेतातच उभारलं हेलिपॅड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 5:28 PM

भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आल्याने ग्रामीण भागात मर्सिडीझ ,फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यु,रेंजरोव्हर ,एमजी हेक्टर कंपन्यांच्या कार मोठ्या प्रमाणावर आढळतात

ठळक मुद्दे भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आल्याने ग्रामीण भागात मर्सिडीझ,फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यु, रेंजरोव्हर,एमजी हेक्टर कंपन्यांच्या कार मोठ्या प्रमाणावर आढळतात

नितिन पंडीत

भिवंडी ( दि. १४ ) हौसेला मोल नाही हा प्रचलित शब्दप्रयोग बऱ्याच वेळा चेष्टेखातर वापरला जातो .परंतु भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी असलेल्या उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क कोणतीही महागडी कार खरेदी न करता थेट आकाशाला गवसणी घालणारे हेलिकॉप्टर खरेदी केले आहे . जो संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आल्याने ग्रामीण भागात मर्सिडीझ,फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यु, रेंजरोव्हर,एमजी हेक्टर कंपन्यांच्या कार मोठ्या प्रमाणावर आढळतात. एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या ताफ्यात वापरली जाणारी कॅडील्याक ही कार भारतात प्रथम खरेदी करण्याचा बहुमान भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर येथील अरुण आर पाटील या आगरी समाजातील उद्योजकांकडे असतानाच आता भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे जनार्दन भोईर यांनी चक्क ३० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वाना अचंबित केले आहे.

घरी गाडी बंगला असताना जनार्दन भोईर यांनी बांधकाम व्यवसायात उतरून आपल्या जमिनीत गोदाम बनविले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली . यातून आर्थिक सुबत्ता आलेल्या जनार्दन भोईर यांचे व्यवसाया निमित्त उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तिंशी संपर्क आल्याने त्यांनी या नव्या व्यवसायाचे धाडस केले असून, स्वतःला दुग्ध व्यवसायासाठी पंजाब हरियाणा गुजरात राजस्थान या भागात नेहमी जावे लागते तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी घरी सर्व सुबत्ता असल्याने हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांचे नऊ आसनी नवे कोरे हेलिकॉप्टर १५ मार्च रोजी मिळणार असल्याने आज त्यांच्या जागेवर नक्की काय व्यवस्था आहे याची चाचपणी करण्यासाठी रविवारी मुंबई येथून काही तंत्रज्ञ हेलिकॉप्टर घेऊन वडपे गावात आले होते. त्याठिकाणी अडीच एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनिअर,सुरक्षा रक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार असून आज गावात उतरलेल्या हेलिकॉप्टर मध्ये जनार्दन भोईर यांनी स्वतः न बसता नुकताच गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्य मंडळींसह गावातील आपल्या जवळच्या मित्र मंडळींना फेरफटका मारून आणला, व सर्वांनी या हेलिकॉप्टरचे जंगी स्वागत केले .

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरीbhiwandiभिवंडीHelicopter Eelaहेलिकॉप्टर ईला