भिवंडीत मुसळधार पावसामुळे नागरिकांची दैना; रस्त्यावर साचले पाणी

By नितीन पंडित | Updated: July 14, 2023 15:25 IST2023-07-14T15:24:47+5:302023-07-14T15:25:17+5:30

येथील अनेक दुकानात पाणी शिरल्याने दुकानामधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Heavy rains in Bhiwandi cause loss of citizens; Water on the road | भिवंडीत मुसळधार पावसामुळे नागरिकांची दैना; रस्त्यावर साचले पाणी

भिवंडीत मुसळधार पावसामुळे नागरिकांची दैना; रस्त्यावर साचले पाणी

भिवंडी : शहर व ग्रामीण भागात गुरुवारी दुपारी सुरू झालेल्या मुसळधार  पावसाने पुन्हा एकदा शहरातील नालेसफाईची पोलखोल झाली आहे. भिवंडी शहरातील तीनबत्ती येथील भाजी मार्केट, चिकन मार्केट असलेल्या बाजारपेठ परिसरात रस्त्यावर २ ते ३ फुटांपर्यंत पाणी साचल्याने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. 

येथील अनेक दुकानात पाणी शिरल्याने दुकानामधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या सोबतच नदी नाका,म्हाडा कॉलनी,इदगाह,मंगल भवन,कमला हॉटेल,अंजूर फाटा या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे या भागातील रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला होता. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून शाळकरी विद्यार्थी मोठा आनंद घेतांना दिसून आले. 

धामणकर नाका ते कल्याण नाका दरम्यान रस्त्या लगतच्या गटारींची सफाई न झाल्याने रस्त्यावर तीन फुटापर्यंत पाणी साचल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. सखल भागा सह बाजारपेठेत पाणी शिरण्यालाने महानगर पालिका प्रशासनाने कोट्यवधी रूपये खर्च करून केलेली नाले सफाईची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे.

Web Title: Heavy rains in Bhiwandi cause loss of citizens; Water on the road