मीरा भाईंदरमध्ये दुसऱ्या दिवशीही मुसळधार, राष्ट्रीय महामार्गही पाण्याखालीच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 09:53 PM2020-08-05T21:53:28+5:302020-08-05T22:03:11+5:30

या पावसाला सोमवारी रात्रीपासून सुरूवात झाली. तो आज बुधवारी सकाळपर्यंत कोसळत होता. यानंतर सायंकाळी पुन्हा जोरदार वाऱ्यासह पावस सुरू झाला. मंगळवारी रात्रभर पाऊस सुरू असल्याने शहरांतील झोपड्पट्टी, गावठाण भागात तसेच इमारतींच्या तळ मजल्यात राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले होते.

Heavy rain in Mira Bhayandar water logging in houses and shops Road also block | मीरा भाईंदरमध्ये दुसऱ्या दिवशीही मुसळधार, राष्ट्रीय महामार्गही पाण्याखालीच 

मीरा भाईंदरमध्ये दुसऱ्या दिवशीही मुसळधार, राष्ट्रीय महामार्गही पाण्याखालीच 

Next
ठळक मुद्देपावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता.तळमजल्यांवर राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरलेले पाणी आजही कायम असल्याने अनेकांच्या चुली पेटल्या नाही. या पावसाला सोमवारी रात्रीपासून सुरूवात झाली. तो अजूनही कोसळतच आहे.

ठाणे - मीरा भाईंदरमध्ये बुधवारीही मुसळधार पाऊस झाला. यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि घोडबंदर मार्ग पाण्याखाली असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता. तळमजल्यांवर राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरलेले पाणी आजही कायम असल्याने अनेकांच्या चुली पेटल्या नाही. 

या पावसाला सोमवारी रात्रीपासून सुरूवात झाली. तो आज बुधवारी सकाळपर्यंत कोसळत होता. यानंतर सायंकाळी पुन्हा जोरदार वाऱ्यासह पावस सुरू झाला. मंगळवारी रात्रभर पाऊस सुरू असल्याने शहरांतील झोपड्पट्टी, गावठाण भागात तसेच इमारतींच्या तळ मजल्यात राहणाऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यांच्या घरात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी अधिक पाणी साचले होते. संजयगांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगरांवरून आजही मोठ्या प्रमाणावर पाण्याचे लोंढे आले.

घरात आणि दुकानांत पाणी शिरल्याने अनेकांना अख्खी रात्र जागूनच काढावी लागली. घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या, धान्याचे, विविध प्रकारच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. इमारतीच्या तळमजल्यात राहणाऱ्यांना, त्यांच्यावरच्या मजल्यात राहण्यांनी आश्रय दिला. याशिवाय पाणी शिरल्याने अनेकांच्या वाहनांचेही नुकसान झाले आहे.

आजही शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्ते पाणी साचल्याने ठप्प झाले होते. त्याच सोबत वरसावे नाका, मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि घोडबंदर मार्गवरही कमरेपर्यंत पाणी साचल्याने बंद होते. काशिमीरा उड्डाणपुलावर तर वाहने अनेक तास अडकून पडली होती. 

पावसामुळे आजही शहरात अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. मीरारोडच्या गौरव रेसिडेन्सी जवळील आंधळे गार्डन इमारतीची कुंपण भिंत पडल्याने त्याखाली अनेक दुचाकी गाड्या सापडल्या. शहरातील लोकांचे अतोनात हाल व नुकसान होत असताना मात्र, महापालिका व लोकप्रतिनिधी या परिस्थितीकडे काना डोळा करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. लोकांना आवश्यक मदत मिळाली नाही, असे अनेक जण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या -

मुंबईत मुसळधार, कोविड स्पेशल जेजे रुग्णालयात घुसलं पाणी; आदित्य ठाकरेंचं घरातच थांबण्याचं आवाहन

मशिदीच्या पायाभरणीवर योगींचं वक्तव्य; म्हणाले - "मला कुणी बोलावणार नाही अन् मी जाणारही नाही"

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

Web Title: Heavy rain in Mira Bhayandar water logging in houses and shops Road also block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.