हुंड्यासाठी परदेशातही विवाहितेचा छळ; भिवंडीत पती विरोधात गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Updated: October 20, 2023 18:58 IST2023-10-20T18:58:21+5:302023-10-20T18:58:42+5:30

केनिया येथे राहणाऱ्या आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

harassment of married women abroad for dowry case filed against husband in bhiwandi | हुंड्यासाठी परदेशातही विवाहितेचा छळ; भिवंडीत पती विरोधात गुन्हा दाखल

हुंड्यासाठी परदेशातही विवाहितेचा छळ; भिवंडीत पती विरोधात गुन्हा दाखल

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी : केनिया या परदेशात पतीसोबत राहणाऱ्या विवाहित महिलेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने अखेर पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेने भिवंडी येथील आपल्या माहेरी परतून दिलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात गुरुवारी केनिया येथे राहणाऱ्या आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. केवल दिनेश सुमरिया असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. 

गुजराथ राज्यातील जामनगर येथील केवल सुमरीया याचा विवाह निशा हिच्या सोबत झाला होता.त्यानंतर दोघेही परदेशी केनिया या देशात वास्तव्यास होते.२०१५ ते २०२२ या दरम्यानच्या काळात पती केवल याने पत्नी निशा हिच्याकडे पैशांची सतत मागणी करून तिचा मानसिक व शारिरीक छळ सुरू केला होता.या त्रासाला कंटाळून अखेर निशा भारतात परतली .त्यानंतर घडलेला प्रकार घरच्यांना सांगत स्थानिक नारपोली पोलिस ठाण्यात पती विरोधात तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: harassment of married women abroad for dowry case filed against husband in bhiwandi