शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनावर मात केल्यानंतर पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हही जाहीर झाल्याने आनंद द्वीगुणित झाला

By जितेंद्र कालेकर | Updated: May 9, 2020 00:10 IST

ठाण्यातील खाकी वर्दीतील योद्धयाने अलिकडेच कोरोनावर विजय मिळविला. गुणवत्तापूर्ण पोलीस सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हही जाहीर झाल्यामुळे आपला आनंद द्वीगुणित झाला असून आणखी चांगले काम करण्याची यातून स्फूर्ती मिळाल्याचा विश्वासही पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देगुणवत्तापूर्ण सेवेबद्दल मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांना सन्मानचिन्ह 56 हजार 350 रोख रकमेसह 109 बक्षिसांचाही समावेश

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणो: कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या मुंब्रा पोलीस ठाण्यातील खाकी वर्दीतील योद्धयाने अलिकडेच कोरोनावर विजय मिळविला. गुणवत्तापूर्ण पोलीस सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्हही जाहीर झाल्यामुळे आपला आनंद द्वीगुणित झाला असून आणखी चांगले काम करण्याची यातून स्फूर्ती मिळाल्याची प्रतिक्र ीया पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर म्हणाले, कोरोनामुळे सुरु असलेल्या संचारबंदीच्या काळात मुंब्रा पोलीस ठाण्यासारख्या आव्हानात्मक कार्यक्षेत्रात नागरिकांमध्ये या साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी झोकून देऊन काम केले. हे काम करीत असतानाच कोरोनाची लागण झाली. त्यावेळी मानसिकरित्या खचलो. मात्र, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकारी, सहकारी, मित्र, नातेवाईक आणि महत्वाचे कुटुंबीय खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहिल्याचे ते सांगतात. वरिष्ठांनी दिलेल्या मानसिक आधारामुळेच आपण या आजारातून सुखरूप बाहेर येऊ शकलो. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पोलीस महासंचालकाकडून आतापर्यंतच्या उल्लेखनीय सेवेचा गौरव होऊन पोलीस महासंचालक स्मृतिचिन्ह जाहीर झाले. आपल्या कामाचा वरिष्ठांकडून गौरव होत असल्याचे पाहून आणखी चांगले काम करण्याची स्फूर्ती मिळाली असून पुन्हा कामावर रु जू झाल्यावर अधिक जोमाने अशीच कामगिरी बजावण्याचा निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे.* अशी आहे कामगिरी..सध्या मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले क्षीरसागर हे 1991 मध्ये कॉन्स्टेबल पदावर पोलीस सेवेत भरती झाले. 2001 मध्ये ते उपनिरीक्षक झाले. पोलीस दलात 28 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी मुंबई शहर, ठाणे शहर, मुंबई लोहमार्ग आदी ठिकाणी सेवा केली. मेहनत, सचोटी आणि निष्णांत गुन्हे शोधक या गुणांमुळे आदर्श काम करणारा अधिकारी म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यांना 56 हजार 350 रोख रकमेसह 109 बक्षिसे मिळाली आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्यात त्यांनी आॅगस्ट 2018 मध्ये अनधिकृतपणे चालणारे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त करु न 14 लाख 41 हजारांच्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यामुळे शासनाचा 36 कोटींचा महसूलही त्यांनी वाचविला. मार्च 2019 मध्ये 15 लाख 76 हजारांच्या बनावट नोटाही त्यांनी जप्त केल्या. अंमली पदार्थाची विक्र ी करणाºया आरोपींवरही त्यांनी मोठया प्रमाणात कारवाई केली. त्यांना आतार्पयत उत्कृष्ठ कामिगरीबद्दल 91 प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले आहे.--

‘‘ हा आजार इतर आजारांप्रमाणे बरा होतो. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये. फक्त तो होऊच नये यासाठी आवश्यक असणारी खबरदारी घ्यावी. स्वत:ची प्रतिकाशक्ती वाढवावी. पोलीस आयुक्त आणि सह आयुक्त यांनीही वैयक्तिकरित्या फोन करुन पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे कळविले. सर्वच वरिष्ठ अधिकारी पाठीशी असल्यामुळे मनावरचा ताणही कमी झाला. नागरिकांनीही सोशल डिस्टसिंगचे आणि स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळून खबरदारी घेणे आवश्यक आहे.’’अरुण क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, मुंब्रा

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस