शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

देहविक्री करणाऱ्यांना मिळणार अनुदान, खात्यात ८६ लाख ७२ हजार वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 01:49 IST

खात्यात ८६ लाख ७२ हजार वर्ग

ठाणे : ठाणे जिल्ह्यात वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात टाळेबंदीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह देहविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांनादेखील बसला आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न उभा ठाकला होता. यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार या व्यवसायात कार्यरत महिलांना व ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त आर्थिक मदत कोणत्याही ओळखपत्राशिवाय देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महिलांना अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप झाले. ९०० महिलांना शिधापत्रिकांचेदेखील वाटप करण्यात आले. यावेळी शिधावाटप फ विभाग उपनियंत्रक नरेश वंजारी आदी उपस्थित होते.     

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवेतील आस्थापनाव्यतिरिक्त इतर सर्व कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे खासगी क्षेत्रासह विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींवर बेरोजगारीची, तर अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली. त्यात देहविक्री करून आपला व मुलांचा सांभाळ करणाऱ्या महिलांवरदेखील या टाळेबंदीचा परिणाम जाणवू लागला होता. या महिलांनादेखील उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) या संस्थेकडून दाखल याचिकेमध्ये वेश्याव्यवसायात कार्यरत महिला व त्यांच्या मुलांना कोविड कालावधीमध्ये अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.  त्याअनुषंगाने राज्यात तत्काळ कार्यवाही होण्यासाठी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यंत्रणेला कार्यवाहीचे निर्देश दिले होते.

९५२ महिलांना दिले रेशनकार्डज्या महिलांकडे बँक खाते नाही, रेशनकार्ड नाही अशा महिलांचे बँक खाते सुरू करणे, रेशनकार्ड काढण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला आणि त्यांच्या बँक खात्यावर अर्थसाहाय्याची रक्कम वर्ग केली आहे. ज्या महिलांकडे रेशनकार्ड नाही अशा महिलांना रेशनकार्ड काढून देण्याबाबत संबंधित शिधावाटप अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानुसार ९५२ महिलांना रेशनकार्ड उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र