अडीच वर्षांच्या मुलीसह आजोबा खाडीत बुडाले, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

By मुरलीधर भवार | Updated: December 23, 2023 16:11 IST2023-12-23T16:05:12+5:302023-12-23T16:11:57+5:30

Dombivali News: डोंबिवली शहराच्या पश्चिमेतील राजूनगर खाडीत एक अडीच वर्षाची चिमुकली आणि तिचे आजोबा बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस आणि फायर ब्रिगेड यांनी शोध मोहिम सुुरु केली आहे.

Grandfather drowns in creek with two-and-a-half-year-old daughter, shocking incident in Dombivli | अडीच वर्षांच्या मुलीसह आजोबा खाडीत बुडाले, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

अडीच वर्षांच्या मुलीसह आजोबा खाडीत बुडाले, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

- मुरलीधर भवार
डोंबिवली - शहराच्या पश्चिमेतील राजूनगर खाडीत एक अडीच वर्षाची चिमुकली आणि तिचे आजोबा बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस आणि फायर ब्रिगेड यांनी शोध मोहिम सुुरु केली आहे. फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्यांच्या मृतदेहाचा खाडीच्या पाण्यात शोध घेत आहेत. तर पोलिस या दोघांची आेळख पटविण्यासाठी तपास करीत आहेत.

राजूनगर परिसरात खाडी किनारी एक वयोवृद्ध इसम त्याच्या अडीच वर्षाच्या नातीसोबत आले होते. ती मुलगी खेळत होती. खेळत असताना ती खाडी किनारी गेली. अचानाक ती पाण्यात पडली. तिला पाहून बसलेले वयोवृद्ध तिला वाचविण्यासाठी धावले. त्यांनी पाण्यात उडी मारली. चांद शेख नावाचा तरुण या दोघांना वाचविण्यासाठी धावला. मात्र दोघेही बुडाले होते. काही अंतरावर चांद शेख यांनी त्या आजोबाचा हात पाहिला. मात्र तो त्यांना वाचवू शकला नाही. याची माहिती मिळताच माजी नगरसेवक विकास म्हात्रे घटनास्थळी पोहचले. त्यांनी या घटनेची माहिती तात्काळ विष्णूनगर पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन खंदारे त्यांच्या पोलिस पथकासोबत खाजी किनारी पोहचले. फायर ब्रिगेडचे पथकही दाखल झाले. शोध मोहिम सुुरु झाली आहे. हो दोघे कोण होते ? ते कुठून आले होते ? याचा तपास पोलिस करीत आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Grandfather drowns in creek with two-and-a-half-year-old daughter, shocking incident in Dombivli