शासकीय कर्मचाऱ्याने पोलीस मित्रावर झाडली गोळी,दोन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:02 AM2019-04-05T00:02:39+5:302019-04-05T00:09:51+5:30
भिवंडी : शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याने आपल्या कडील गावठी बनावटीच्या रिव्हॉल्वरने पोलीस मित्राच्या घरांत शिरून त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या.परंतू झटापटीत ...
![Government employee shot dead a policeman and two injured | शासकीय कर्मचाऱ्याने पोलीस मित्रावर झाडली गोळी,दोन जण जखमी Government employee shot dead a policeman and two injured | शासकीय कर्मचाऱ्याने पोलीस मित्रावर झाडली गोळी,दोन जण जखमी](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/04-bhiwandi-golibarat-jakhami-nitin-sakpale-2_201904217062.jpg)
शासकीय कर्मचाऱ्याने पोलीस मित्रावर झाडली गोळी,दोन जण जखमी
भिवंडी : शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याने आपल्या कडील गावठी बनावटीच्या रिव्हॉल्वरने पोलीस मित्राच्या घरांत शिरून त्याच्यावर दोन गोळ्या झाडल्या.परंतू झटापटीत नेम चुकल्याने त्याच रिव्हाल्वरच्या लोखंडी दस्त्याने पोलीसाच्या डोक्यावर प्रहार केल्याने पोलीस जखमी झाला आहे.तर आरोपीला पकडण्यास गेलेल्या शेजा-याच्या डोक्यावर दस्त्याने प्रहार केल्याने एकुण दोघेजण जखमी झाले आहेत. गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या आरोपी चंद्रकांत बाविस्कर यास शेजाऱ्यांच्या मदतीने पकडल्याने त्यास नारपोली पोलिसांनी त्यास अटक केली आहे.
नितीन सपकाळे (४०) असे जखमी पोलिसाचे नाव असून तो ठाणे शहर पोलीसमधील वाघाबिळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तर चंद्रकांत बाविस्कर (३६) हे वांद्रे येथील शासकीय कार्यालयात मराठी अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. ते दोघेही मूळचे जळगाव जिल्ह्यातील एकाच परिसरातील असल्याने पूर्वी पासून मित्र आहेत. नितीन सपकाळे हे कशेळी गावात रहात आहेत तर चंद्रकांत बावीस्कर हे जवळच काल्हेर गावात रहात आहेत. त्यामुळे त्यांचे दोघांचे कौटुंबिक संबंध प्रस्थापीत झाले होते. मात्र पुर्व वैमन्यस्यातून चंद्रकांत बाविस्कर याने आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास कशेळी येथील श्री सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये नितीन सपकाळे याच्या घरात घुसून त्याच्यावर गावठी रिव्हाल्वरने गोळीबार केला. परंतु गोळी चुकविल्याने ती समोरील भिंतीत रूतून बसली. त्यामुळे संतापलेल्या बावीस्कर याने नितीन सपकाळे याच्या अंगावर धावत जाऊन त्याच्याशी झटापटी केली आणि सकपाळे याच्या डोक्यात रिव्हॉल्वरचा दस्ता मारला. त्यामुळे सपकाळे हे जखमी झाले. इमारतीत झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने सकपाळेच्या शेजारील अभिषेक यादव याने धावत जाऊन चंद्रकांत बावीस्कर यास पकडले. त्यामुळे बावीस्कर याची यादव बरोबर झटापट झाली. या झटापटीत बावीस्कर याने यादवच्या देखील डोक्यावर रिव्हॉल्वरचा लोखंडी दस्ता मारल्याने त्यास दुखापत झाली आहे. दरम्यान परिसरांतील लोकांनी जखमी पोलीस नितीन सकपाळे यास ताबडतोब काल्हेर येथील खाजगी रूग्णालयांत उपचाराकरीता दाखल केले. या प्रकरणी माहिती मिळताच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन आरोपी चंद्रकांत बाविस्कर यास अटक करून त्याच्याकडून दोन गावठी बनावटीच्या रिव्हॉल्वरसह ताब्यात घेतले. या घटनेप्रकरणी बावीस्कर याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.