ग्लोबल रुग्णालयातील रुग्णांचे मोबाईल चोरणारा निघाला पेशंट केअर टेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 20:52 IST2021-06-01T20:49:16+5:302021-06-01T20:52:08+5:30

ग्लोबल रुग्णालयातील दोन रुग्णांचे मोबाईल चोरणाऱ्या गणेश मुकेश मखवाना (२१) या पेशंट केअर टेकरला कापूरबावडी पोलिसांनी आता कायदेशीर नोटीस बजावली आहे.

Global Hospital Patient Mobile Theft Patient Care Taker | ग्लोबल रुग्णालयातील रुग्णांचे मोबाईल चोरणारा निघाला पेशंट केअर टेकर

कापूरबावडी पोलिसांची कारवाई

ठळक मुद्देपोलिसांनी बजावली नोटीस कापूरबावडी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ग्लोबल रुग्णालयातील दोन रुग्णांचे मोबाईल चोरणाऱ्या गणेश मुकेश मखवाना (२१) या पेशंट केअर टेकरला कापूरबावडी पोलिसांनी आता कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्याच्याकडून २१ हजारांचे दोन मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.
ठाणे महापालिकेच्या साकेत येथील ग्लोबल रुग्णालयात महेंद्र पवार (६०) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांचा २७ एप्रिल २०२१ रोजी मृत्यु झाला होता. मात्र, २४ ते २७ एप्रिल या काळात त्यांच्याकडील मोबाईल गहाळ झाला होता. महेंद्र यांच्या मृत्युनंतर त्यांचा हा मोबाईल मात्र न मिळाल्याने त्यांचा मुलगा वितनू पवार यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात १५ मे रोजी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड यांच्या पथकाने कळवा, जानकीनगर येथील गणेश मखवाना याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने याच रुग्णालयात आणखी एक मोबाईल चोरल्याचीही कबूली दिली. तो कोरोना रुग्णांच्या संपर्कात असल्यामुळे त्याला आता केवळ नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबतचे आरोपपत्र लवकरच न्यायालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Global Hospital Patient Mobile Theft Patient Care Taker