शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

जीपीओमध्ये मराठी मुलांना प्राधान्य द्या; मनसेचे ठाण्यात पोस्ट ऑफीसवर आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 15:25 IST

केंद्राच्या वतीने विविध ठिकाणच्या पोस्ट ऑफीसमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यानुसार २७५ उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. परंतु यामध्ये एकाही मराठी मुलाचा उल्लेख नसल्याने त्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महाराष्ट्रातील पोस्ट ऑफीसमधील भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी बुधवारी ठाण्यात मनसेच्या वतीने ठाणे स्टेशन जवळील पोस्ट ऑफीसवर आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाण्यातील भरतीमध्ये एकही बाहेरील उमेदवार घेतला जाऊ नये अशी मागणी मनसेचे ठाणो शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी केली. तरीसुध्दा ही भरती प्रक्रिया झाला तर मनसे स्टाईलने खळखटय़ाक आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्राच्या वतीने विविध ठिकाणच्या पोस्ट ऑफीसमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यानुसार २७५ उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. परंतु यामध्ये एकाही मराठी मुलाचा उल्लेख नसल्याने त्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. ठाण्यात मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्टेशन परिसरातील पोस्ट ऑफीसवर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठी मुलांना न्याय द्या, भरतीमध्ये मराठी मुलांना स्थान अशी मागणी करीत येथील पोस्ट ऑफीसर यांना घेराव घालण्यात आला. यावेळी त्यांनी २७५ उमेदवारांची यादी पोस्ट अधिका:यांच्या हाती दिली. त्यानंतर, यामध्ये एकाही मराठी मुलाच्या नावाचा उल्लेख नसल्याची बाब त्यांनी त्यांच्या निर्दशनास आणून दिली. त्यानुसार ही बाब खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगत किमान महाराष्ट्रात तरी मराठी मुलांना स्थान देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच या संदर्भात त्यांनी लेखी आश्वासन देखील घेतले. परंतु तरी देखील मराठी मुलांना स्थान दिले गेले नाही तर मनसे स्टाईलने खळखटय़ाक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मोरे यांनी दिला.

दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या पोस्टमनच्या भरती प्रक्रियेत ठाण्यात ५० मराठी मुलांना स्थान देण्यात आल्याची माहिती यावेळी पोस्ट ऑफीसचे सुप्रीडेंट एस. बी. वायधरे यांनी मनसेच्या निदर्शनास आणून दिली. तसेच मनसेने दिलेले निवेदन जीपीओला पाठविले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

टॅग्स :MNSमनसेPost Officeपोस्ट ऑफिस