प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीचा विनयभंग करणा-या तरुणाला ठाण्यात अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: October 22, 2018 22:05 IST2018-10-22T21:59:52+5:302018-10-22T22:05:50+5:30

एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या तरुणीची काही महिन्यांपूर्वी ठाण्यात हत्या झाली होती. अशाच प्रकारे एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या होकारासाठी तिला चाकू दाखवून धमकावणाºया निहार बेलोसे याला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

The girl who refuses to love, molesting by friend: accused arrested in Thane | प्रेमास नकार देणाऱ्या तरुणीचा विनयभंग करणा-या तरुणाला ठाण्यात अटक

आधी मैत्रि करुन नंतर प्रेमाचा प्रस्ताव

ठळक मुद्देपाठलाग करुन विनयभंगआधी मैत्रि करुन नंतर प्रेमाचा प्रस्तावहोकारासाठी चाकूही दाखविला

ठाणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करणा-या निहार बेलोसे (२१, रा. पाटीलवाडी,नौपाडा, ठाणे) याला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याने संबंधित मुलीला चाकू दाखवून मारण्याची धमकीही दिली होती.
नौपाड्याच्या गणेशवाडी भागात राहणा-या या मुलीशी त्याची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीतूनच त्यांच्यात मैत्रिही झाली होती. पुढे त्याने तिला प्रेमासाठी होकार देण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकला. त्याच्या मागणीला तिने स्पष्ट नकार दिला होता. तरीही त्याने तिचा पाठलाग सुरूच ठेवला होता. अगदी अलिकडेच ६ आॅक्टोंबर २०१८ रोजी दुपारी १२ वा. च्या सुमारास मित्रासोबत पाण्याची बाटली घेण्यासाठी ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या समोरील दुकानात जात असतांना त्याने तिला चाकू दाखवून धमकावले होते. ‘तू माझ्या सोबत चल, तू माझ्या घरच्यांना टॉर्चर करते, मी तुला सोडणार नाही,’ असे म्हणून धमकी देऊन तिचा विनयभंगही केला. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून तिने अखेर याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. याच तक्रारीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शुभांगी गवते यांच्या पथकाने त्याला २२ आॅक्टोबर रोजी अटक केली. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बेलोसे हा वागळे इस्टेट पोलिसांना हुलकावणी देत होता. मोबाईल न बाळगता तो घरीही येत नव्हता. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते.
..................
प्राची झाडे सारखा प्रकार होण्यापूर्वी रोखला
या १९ वर्षीय तरुणीने निहारला स्पष्ट नकार देऊनही तो तिचा सतत पाठलाग करीत होता. तिच्या होकारासाठी त्याने तिला चाकूही दाखविला होता. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर तो घरीही मिळत नव्हता. त्याच्याकडे चाकू असल्यामुळे त्याला अटक होणे गरजेचे होते. त्याच्या अटकेमुळे प्राची झाडेसारखा प्रकार रोखता आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पठाण यांनी सांगितले.

Web Title: The girl who refuses to love, molesting by friend: accused arrested in Thane