शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘गावगाडा-प्राचीन ते अर्वाचीन’ संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल; बी. डी. कुलकर्णी यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:22 IST

बी. डी. कुलकर्णी यांचे मत

ठाणे : समाजव्यवस्था सुरळीतपणे चालण्यासाठी सामूहिकपणे निर्माण केलेली गावगाडा ही पद्धती दीड हजाराहून अधिक वर्षे अस्तित्वात आहे. सदाशिव टेटविलकर यांनी या गावगाड्याचे स्वरुप कुशलतेने रेखाटले असून त्याचा उपयोग निश्चितच संदर्भ ग्रंथ म्हणून होईल, अशा भावना भारत इतिहास संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. बी.डी. कुलकर्णी यांनी आपल्या शुभसंदेशातून व्यक्त केल्या. 

कोकण इतिहास परिषद, श्रीकृपा प्रकाशन व मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर लिखित ‘गावगाडा - प्राचीन ते अर्वाचीन’ या पुस्तकाचे प्रकाशन कोविडच्या वाढत्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले. फेसबुक लाईव्हव्दारे या पुस्तकाचे अनौपचारिक प्रकाशन निवडक उपस्थितीत मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, लेखक सदाशिव टेटविलकर, कोकण इतिहास परिषदेच्या प्रवक्त्या डॉ. विद्या गाडगीळ व प्रकाशक विश्वनाथ साळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी  महापौर नरेश म्हस्के यांनी शुभसंदेशाव्दारे  टेटविलकर समर्पित भावनेने करीत असलेल्या इतिहास संशोधन कार्याची प्रशंसा करून गावगाडा पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या हरवलेल्या संस्कृतीची माहिती नव्या पिढीला होईल,असा विश्वास व्यक्त केला. समतोल पद्धतीने इतिहास सांगणारे इतिहासकार म्हणून सदाशिव टेटविलकर यांची नोंद ठाण्याच्या इतिहासाला घ्यावीच लागेल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे.  म्हस्के,  नार्वेकर,  कुलकर्णी यांच्या शुभसंदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले.  

टॅग्स :thaneठाणे